जंतर-मंतरवर कुस्तीपटूंचं 16 व्या दिवशी आंदोलन सुरूच; काय आहे आंदोलनस्थळी परिस्थिती?

| Updated on: May 08, 2023 | 12:37 PM

VIDEO | दिल्लीतील जतंर मतंरवर कुस्तीपटूंचं 16 व्या दिवशी अद्याप आंदोलन सुरूच; आंदोलन स्थळी प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या जतंर मंतर या मैदानावर गेल्या काही दिवसांपासून कुस्तीपटुंचं आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा १६ वा दिवस आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करावी ही प्रमुख मागणी घेऊन आंदोलक अद्याप जंतर-मंतरवर ठाण मांडून आहेत. बजरंग पुनिया, साक्षी मलिक यांच्यासह राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटूंच आंदोलन आजही सुरू आंदोलन स्थळी प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या आंदोलनात सहभागी असलेल्या कुस्तीपटूंना देशभरातील अनेक संस्थांचा, राजकीय पक्षांचा आणि काही बड्या लोकांचा पाठिंबा मिळत आहे. हरियाणातील खाप पंचायतीचा विशेष या कुस्तीपटूंना पाठिंबा आहे. मात्र इतके सुरू असूनही बृजभूषण सिंह यांनी आपला राजीनामा दिलेला नाही. दरम्यान, लैंगिक शोषणाचा आरोप बृजभूषण सिंह यांच्यावर करण्यात आला होता. यापार्श्वभूमीवर बृजभूषण सिंह यांच्यावर राजीनाम्यासह कारवाई करण्यात यावी, म्हणून हे कुस्तीपटू आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.

Published on: May 08, 2023 12:37 PM
पटोले यांच्या टीकेवर शहाजी पाटील कडाकडे; म्हणाले, त्याला वरच, खालचं कळतयं काय?
‘एकनाथ शिंदे यांच्या बॅगांवर लक्ष ठेवलं असतं तर…’, संजय राऊत यांना कुणाचा टोला?