बृजभूषण सिंह यांचा राजीनाम्यास नकार, आता आंदोलकांची भूमिका काय?
VIDEO | नवीदिल्लीतील जंतर मंतरवरील कुस्तीपटूंच्या आंदोलनानंतर बृजभूषण सिंह यांचा राजीनामा देण्यास नकार, आता उपोषणातील दिग्गज खेळाडू कोणती घेणार भूमिका?
नवी दिल्ली : कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्या विरोधात दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलन सुरू आहे. अंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंकडून हे आंदोलन सुरू आहे. मात्र अद्याप या आंदोलनावर तोडगा निघालेला नाही. हे कुस्तीपटू गेल्या अनेक दिवसांपासून जंतरमंतर इथे सामूहिक उपोषणाला बसले आहेत. बृजभूषण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंनी लैंगिक शौषण करण्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या उपोषणात दिग्गज खेळाडू सहभागी झाले आहेत. बृजभूषण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंनी लैंगिक शौषण करण्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या उपोषणात दिग्गज खेळाडू सहभागी झाले आहेत. बृजभूषण सिंह विरोधात एफआयआर दाखल करण्यात यावी, अशी मागणी या उपोषणकर्त्यांची आहे. या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून हे उपोषण सुरु आहे. अखेर या मागणीला यश आलं. दरम्यान, जतंर मंतरवर एक पोस्टर लावण्यात आल्याचे पाहायला मिळत असून बृजभूषण सिंह यांच्यावर कोणते गुन्हे आहेत आणि ते कुठे नोंदवण्यात आले आहेत. याची माहिती देणार एक पोस्टर्स सगळ्याचं लक्ष वेधून घेत आहे.