मनसेविरोधात दीपाली सय्यद आक्रमक, ओशिवरा पोलीस ठाण्यात काय केली तक्रार दाखल?

| Updated on: Aug 22, 2023 | 5:52 PM

VIDEO | अभिनेत्री आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या लेखी तक्रारीमध्ये आपल्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट्स करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मुंबई, २२ ऑगस्ट २०२३ | अभिनेत्री आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी आज मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात एक लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीमध्ये त्यांनी आपल्या विरोधात सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह आणि घाणेरड्या कमेंट करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दीपाली सय्यद यांनी आपल्या तक्रारीच्या पत्रात त्यांनी मनसेचे काही कार्यकर्त्यांच्या विरोधात अश्लील कमेंट करत असल्याचा देखील आरोप केला आहे. दीपाली सय्यद यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या लेखी तक्रारीमध्ये आपल्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट्स करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. टोल आणि रस्त्यांमधले खड्डे यावर मनसेने घेतलेल्या भूमिकेचा दीपाली सय्यद यांनी विरोध केला होता. मात्र त्यानंतर मनसेचे काही कार्यकर्ते दीपाली सय्यद यांना सोशल मीडियावर ट्रोल करणे आणि त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह कॉमेंट्स करत आहेत, असा आरोप दीपाली सय्यद यांनी केला आहे. अशा कार्यकर्त्यांविरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Published on: Aug 22, 2023 05:43 PM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस देखील डॉक्टर, जपानमधील विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट जाहीर
‘अन्नाची शपथ घेऊन गद्दारी करणारे दुसऱ्यांना सल्ले देतायंत’, आदित्य ठाकरे यांचा रोख कुणावर?