Nawab Malik | 26 प्रकरणात एनसीबीची चुकीची कारवाई – नवाब मलिक

| Updated on: Oct 26, 2021 | 3:57 PM

एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना एक निनावी पत्रं पाठवलं आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधातील हे पत्रं आहे.

एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना एक निनावी पत्रं पाठवलं आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधातील हे पत्रं आहे. या पत्रात वानखेडेंनी केलेल्या 26 फ्रॉड केसेसचा उल्लेख करण्यात आला आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेतही त्याची माहिती दिली आहे.

मी एनसीबीचा एक कर्मचारी आहे. गेल्या दोन वर्षापासून एनसीबीच्या कार्यालयात कार्यरत आहे. गेल्या वर्षी एनसीबीला सुशांत सिंह राजपूत प्रकणाच्या ड्रग्ज अँगलची चौकशी सोपवण्यात आली. महानिदेशक राकेश अस्थाना यांनी एसआयटीची स्थापना केली. त्यांनी त्यांचे शिष्य कमल प्रीत सिंह मल्होत्रा यांना एसआयटीचे प्रभारी बनवून मुंबईतील या ड्रग्ज अँगलची चौकशी सोपवली. त्यांच्यासोबत समीर वानखेडे होते. वानखेडे हे डीआरआयमध्ये काम करत होते. गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरून आऊट ऑफ वे डीआरआयहून लोन बेसिसवर एनसीबी मुंबईत झोनल डायरेक्टर म्हणून वानखेडेंची नियुक्ती केली. राकेश अस्थाना हे किती प्रामाणिक अधिकारी आहेत हे सर्वांना माहीत आहे. त्यांनी वानखेडे, केपीएस मल्होत्रांना साम, दाम, दंड आणि इतर कोणत्याही प्रकारे बॉलिवूडच्या कलाकारांना ड्रग्ज प्रकरणात अडकवून केसेस बनविण्याचे आदेश दिले. दोघांनीही अस्थानांच्या इच्छापूर्तीसाठी काम केलं.

Kranti Redkar | समीर केवळ कलाकारांना पकडत नाही – क्रांती रेडकर
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 26 October 2021