उपमुख्यमंत्री अजित पवार आम्हाला साथ देत नाहीत, यशोमती ठाकुरांचा गंभीर आरोप
बालसंगोपनासाठी किमान 2,500 रुपये मिळावेत अशी माझी इच्छा आहे. असा प्रस्ताव आम्ही पाठवलाय. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार आम्हाला साथ देत नाहीत, असा गंभीर आरोप यशोमती ठाकूर यांनी केलाय.
मागील कित्येक दिवसांपासून बालसंगोपनाचे पैसे वाढलेले नव्हते. याचे 450 रुपये मिळत होते. आपण हे वाढवून 1,125 रुपये केले. यासाठी किमान 2,500 रुपये मिळावेत अशी माझी इच्छा आहे. असा प्रस्ताव आम्ही पाठवलाय. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार आम्हाला साथ देत नाहीत. त्यामुळे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबाबत मदत करावी, असं मत यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलं. | Yashomati Thakur serious allegations on DCM Ajit Pawar