सोलापुरातील भैरवनाथ यात्रेत अनोखी परंपरा, ऐकून व्हाल थक्क

| Updated on: Apr 06, 2023 | 9:54 PM

VIDEO | करमाळा तालुक्यातील पांगरे येथे भैरवनाथाची यात्रा भरते आणि या भैरवनाथाच्या यात्रेत एक अनोखी परंपरा जपली जाते, ती म्हणजे केसांच्या शेंडीनं...

सोलापूर : करमाळा तालुक्यातील पांगरे येथे भैरवनाथाची यात्रा भरते आणि या भैरवनाथाच्या यात्रेत एक प्रथा परंपरा जपली जाते ती म्हणजे केसांच्या शेंडीने माणसाने भरलेल्या बारा बैलगाड्या ओढण्याची. यंदा शहाजी भारत तोबरे आणि पुजारी राजेंद्र गुरव या मानकऱ्यांनी केसांच्या शेंडीने गाड्या ओढल्या. चैत्र शुद्ध पंचमीपासून पांगरे गावच्या यात्रेला सुरुवात होते. बारा बैल गाड्या केसांच्या शेंडीच्या सहाय्याने ओढण्याचा कार्यक्रम हा महत्वाचा यात्रेतील महत्वाचा सोहळा असतो. बारा गाड्या ओढण्याच्या आधी नऊ दिवस मानकरी कडक उपवास करतात आणि त्यानंतर केसाच्या शेंडीने बारा बैलगाडी ओढण्याचा थरार पार पडतो आणि केसाच्या शेंडीने ओढल्या जाणाऱ्या बारा बैलगाडी पाहण्यासाठी सोलापूर व पुणे,मुंबई आदी अनेक भाविक यावेळी हजेरी लावतात.

Published on: Apr 06, 2023 09:53 PM
निवडणुकांचे बिगुल वाजले, ग्रामपंचायतीतील रिक्त पदांसाठी निवडणुका जाहीर; या दिवशी मतदान
शिंदे यांच्या शिवसेनाला मोठा झटका, ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना दिलासा; काय आहे प्रकरण?