‘काँग्रेसने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, अन्यथा…’; उबाठा गटाच्या नेत्याचा इशारा

| Updated on: Oct 18, 2024 | 4:13 PM

यवतमाळ विधासभा मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा ठोकला आहे. यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाचं शिष्टमंडळ हे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मुंबईत रवाना झाले आहे. यासंदर्भात यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेना राजेंद्र गायकवाड यांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे.

Follow us on

उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे शिष्टमंडळ आज मुंबई येथे रवाना झाले आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघ हा ठाकरे गटाला देण्यात यावा, अशी मागणी हे शिष्टमंडळ उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहे. सोबतच यवतमाळ जिल्ह्यातील वणी, दिग्रस, उमरखेड आणि यवतमाळ हे चार विधानसभा क्षेत्र ठाकरे गटाला सुटावे, अशी मागणीही करणार आहे. महाविकास आघाडीमध्ये अद्याप तिकिटांचा तिढा कायम नसून यवतमाळ विधानसभेत 2014 आणि 2019 मध्ये कमी अधिक फरकाने उमेदवार पराभूत झाला होता. यवतमाळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार माजी आमदार संदीप बाजोरिया आणि काँग्रेसकडून बाळासाहेब मांगुळकर यांनी आपल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारास जोरदार सुरुवात केली आहे. त्यामुळे आता हा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या कुठल्या पक्षाच्या वाटल्या येणार हे जरी निश्चित नसले तरी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला सोडावा, अशी मागणी या शिष्टमंडळाकडून करण्यात येणार आहे. कॉंग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा उद्धव ठाकरे यांना घोषित करावे अन्यथा हरियाणा होईल, असा इशारा यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेना राजेंद्र गायकवाड यांनी दिला आहे.