Chhagan Bhujbal : विजयानंतर भुजबळांचा जरांगेंवर निशाणा; म्हणाले, ‘सुपडासाफ… रात्री 3 वाजेपर्यत सभा घेतल्या पण…’

| Updated on: Nov 24, 2024 | 12:06 PM

विधानसभा निवडणुकीच्या पू्र्वी मंत्री छगन भुजबळ यांचा सुपडासाफ होणार असल्याची भाषा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मात्र विजयानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना यासंदर्भात सवाल केला असता छगन भुजबळ स्पष्टच म्हणाले...

नाशिकच्या येवला मतदारसंघातून 26 हजार 681 मतांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ विजयी झाले आहेत. त्यांनी शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे यांचा पराभव केला आहे. या विजयानंतर ढोल ताशाच्या गजरात भुजबळांच्या विजयाचा जल्लोष कार्यकर्त्यांकडून झाला. यानंतर त्यांनी पत्रकारपरिषद घेतली. यावेळी ते म्हणाले. ‘मनोज जरांगे पाटील यांचा सुपडासाफ झालाय. मनोज जरांगे पाटील यांनी माझ्या पराभवासाठी रात्री तीन वाजेपर्यंत सभा घेतल्यात’, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. विधानसभा निवडणुकीच्या पू्र्वी मंत्री छगन भुजबळ यांचा सुपडासाफ होणार असल्याची भाषा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मात्र विजयानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना यासंदर्भात सवाल केला असता छगन भुजबळ स्पष्टच म्हणाले, आता जे बोलले त्यांच्याच सुपडासाफ झाला. जे रात्री दोन-तीन वाजेपर्यंत फिरले, माझ्या सभा होत्या, तिथे यायचे मुद्दाम फटाके लावायचे, मुद्दाम घोषणाबाजी करायचे. पाटोदा आणि लासलगावला.. पण एक माणूस माझ्या सभेतून उठला नाही. ते इथेच यशस्वी झाले नाही तर महाराष्ट्रात कसे यशस्वी होणार, असं म्हणत नाव न घेता मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांनी टीकास्त्र टागलंय.

Published on: Nov 24, 2024 12:06 PM