Yevla Election Result 2024 : छगन भुजबळ यांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात विजयाचा गुलाल कोणाचा?

| Updated on: Nov 23, 2024 | 9:29 AM

Yevla Election Result 2024 : ईव्हीएम मोजणीत छगन भुजबळ हे पिछाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाने माणिकराव शिंदे हे आघाडीवर आहेत. त्यामुळे यंदा येवल्यात मोठा गेम होणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

महायुती सरकारमधील मंत्री आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना सर्वात मोठा धक्का बसल्याचे समोर आले आहे. ईव्हीएम मोजणीत छगन भुजबळ हे पिछाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाने माणिकराव शिंदे हे आघाडीवर आहेत. त्यामुळे यंदा येवल्यात मोठा गेम होणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. सुरू झालेल्या मतदानानंतरच्या मतमोजणीत येवल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे छगन भुजबळ हे पिछाडीवर गेले आहेत. तर मविआचे उमेदवार माणिकराव शिंदे यांनी आघाडी घेतली आहे. येवला विधानसभा मतदारसंघ हा छगन भुजबळांचा बालेकिल्ला मानला जातो. यंदा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतून अजित पवार यांच्याकडून छगन भुजबळांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाने माणिकराव शिंदे यांना निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळे यंदा येवल्याचा गड कोण राखणार आणि येवल्यात विजयाचा गुलाल कोणाचा? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.

Published on: Nov 23, 2024 09:27 AM
Mahim Election Result 2024 : माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
Kopri-Pachpakhadi Election Result 2024 : कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की…?