Sanjay Raut | तुम्ही जी नावं घेतली त्यासाठी पोलीस अधिकाऱ्याची भेट घेण्याची गरज नाही
नागपूरला मी दोन वर्षांनी आलोय, नागपूरात खूप काही बदल झालाय, अधिवेशन काळानंतर आलोय, कोविड काळात येऊ शकलो नाही, पण मी आता नागपूरला येणं सुरू करतोय निवडणुका वगैरे आहेतचं पण नागपूर आणि विदर्भाच्या संघटनात्मक बांधणीसाठी मला नागपूरात यावे लागणार आहे.
नागपूरमध्ये (nagpur) शिवसेना नेत खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी पोलिस आयुक्तांची (Commissioner of Police) भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी संजय राऊत म्हणाले की, ही माझी आणि त्यांची सदिच्छा भेट होती. दोन वर्षाच्या कालावधीनंतर संजय राऊत नागपूरात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु त्यांनी माझे आणि पोलिस आयुक्तांचे संबंध चांगले असल्याने मी त्यांची भेट घेतल्याचे सांगितले. त्याचबरोबर तुम्ही ज्यांची नाव घेतली त्यासाठी मला आयुक्तांची भेट घेण्याची कधीही गरज वाटलेली नाही. मला जे काही जाहीर करायचं असेल ते मी नागपूरमध्ये येऊनचं जाहीर करेन. नागपूरला मी दोन वर्षांनी आलोय, नागपूरात खूप काही बदल झालाय, अधिवेशन काळानंतर आलोय, कोविड काळात येऊ शकलो नाही, पण मी आता नागपूरला येणं सुरू करतोय निवडणुका वगैरे आहेतचं पण नागपूर आणि विदर्भाच्या संघटनात्मक बांधणीसाठी मला नागपूरात यावे लागणार आहे.