असं असणार अयोध्येतील भव्य दिव्य डोळे दिपवणारं राम मंदिर, रामलल्लाच्या बाजूला आणखी कुणाची मंदिरं?
उद्या दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला सुरूवात होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला अवघे काही तास बाकी आहे. याच अयोध्येतील राम मंदिराची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत? राम मंदिर परिसरात आणखी कुणाची मंदिरं असणार?
अयोध्या, २१ जानेवारी २०२४ : उद्या अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला विराजमान होणार आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला सुरूवात होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला अवघे काही तास बाकी आहे. याच अयोध्येतील राम मंदिराची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत? राम मंदिर परिसरात आणखी कुणाची मंदिरं असणार? तुम्हला माहितीये का? अयोध्येतील ८ एकर जमिनीत हे राम मंदिर उभारलं आहे. यापैकी अडीच एकरात रामाचं मुख्य मंदिर आहे. या मंदिराच्या भोवती परिक्रमा मार्ग आहे. याच तटबंदीत इतर काही मंदिरं आहे. यामध्ये गणेश, सूर्य, शिव, भगवती, हनुमान आणि अन्नपूर्णेचं मंदिर आहे. तर येत्या ६ ते ७ महिन्यात आणखी कुणाची मंदिरं उभारली जाणार बघा व्हिडीओ…
Published on: Jan 21, 2024 11:34 PM