Sanjay Raut : 2024मध्ये कोण मसणात जाईल ते कळेलच, संजय राऊतांचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर
शिवसेना नेते संजय राऊत हे दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत.
कोल्हापूर : शिवसेना (Shiv Sena)आणि भाजप (BJP) यांच्यामधील द्वंद सर्वश्रृत आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये वार-पलटवार सुरु असतात. यात शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊत हे दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही टीका केली. तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. दिल्लीत जा, नाही तर मसणात जा, असं बेताल विधान करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी तोफ डागली आहे. त्यांच्यावर संस्कारच तो आहे. त्यांची ती जी भाषा आहे, त्याला आम्ही विकृती म्हणतो. ते त्यांचं वैफल्य आहे. 2024 साली कोण मसणात जाईल ते कळेलच, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला.
Published on: May 28, 2022 01:44 PM