पुण्यात दिवसाढवळ्या राडा, गाडीला कट मारला म्हणून ‘त्यानं’ थेट काढली पिस्तुल अन्…
भर रस्त्यात पिस्तुल काढणाऱ्या आरोपीचं नाव प्रताप धर्म टक्के असं असून त्याने लहानशा किरकोळ वादावरून पिस्तुल काढले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशन मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पुणे, ८ फेब्रुवारी २०२४ : पुण्यात किरकोळ कारणावरून पिस्तुल काढत युवकाने चांगलाच राडा घाल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यात भर रस्त्यात पिस्तुल काढत खाजगी अंगरक्षकाने हा राडा केला. पुण्यातील हडपसर भागातील घटना असून याप्रकरणी पुणे पोलीस तपास करत आहेत. भर रस्त्यात पिस्तुल काढणाऱ्या आरोपीचं नाव प्रताप धर्म टक्के असं असून त्याने लहानशा किरकोळ वादावरून पिस्तुल काढले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशन मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. गाडीला कट मारल्याचा कारणावरून आरोपी आणि फिर्यादीमध्ये हा वाद झाला. फिर्यादीला जाब विचारताच आरोपीकडून पिस्तुल काढत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे सांगितले.
Published on: Feb 08, 2024 12:53 PM