अजित पवार बोलत असताना तरूणांचा गदारोळ, भंडाऱ्यातील सभेत नेमकं काय घडलं?

| Updated on: Nov 20, 2023 | 4:35 PM

डेंग्यूवर मात करून अजित पवार हे पुन्हा एकदा सक्रीय. भंडाऱ्यात शासन आपल्या दारी या कार्यक्रमात अजित पवार यांनी डेंग्यू आजारातून बाहेर पडल्यानंतर पहिलीच जाहीर सभा घेतली. अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष लागलेलं असताना अजित पवार यांचं भाषण सुरु असताना अचानक काही तरुणांनी घातला गोंधळ

भंडारा, २० नोव्हेंबर २०२३ : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याच्या राजकारणात सक्रिय दिसत नव्हते. यावरून अजित पवार यांच्यावरून उलट-सुलट चर्चा रंगताना दिसत होत्या. त्या दरम्यान, अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली असल्याचे सांगण्यात आलं. मात्र विरोधकांसह सरकारमधील काही नेत्यांनी देखील अजित पवार यांच्या डेंग्यूवर शंका उपस्थित केली. या डेंग्यूवर मात करून अजित पवार हे पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे पाहायला मिळाले. भंडाऱ्यात आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अजित पवार यांनी डेंग्यू आजारातून बाहेर पडल्यानंतर पहिलीच जाहीर सभा झाली. पहिल्या सभेतील पहिल्या भाषणात अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष लागलेलं असताना अजित पवार यांचं भाषण सुरु असताना अचानक काही तरुणांनी घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले. या तरुणांनी कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी सतर्कता दाखवत या तरुणांना ताब्यात घेतलं. पण तरीही काही काळ गर्दीमधील वातावरण तणावाचं होतं.

Published on: Nov 20, 2023 04:30 PM
संजय राऊत यांच्या ‘त्या’ सनसनाटी आरोपावर चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया काय?
NCP : राष्ट्रवादी नेमकी कुणाची? थोड्याच वेळात निवडणूक आयोगात सुनावणी, कोण-कोण उपस्थित?