रोहित पवार जमिनीवर बसले, कार्यकर्ते खाली पडले, पोलिसांची दमछाक; ‘यात्रे’च्या समारोपानंतर विधानभवनाबाहेर ‘संघर्ष’

| Updated on: Dec 12, 2023 | 6:40 PM

रोहित पवार यांच्या नेतृत्वातील युवा संघर्ष यात्रा ही राज्यभरात 800 किमीचा प्रवास करुन नागपुरात दाखल झाली. या संघर्ष यात्रेत आमदार रोहित पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते मात्र युवा संघर्ष यात्रेतील कार्यकर्त्याचा मोर्चा विधानभवनावर धडकणार त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना रोखलं.

नागपूर, १२ डिसेंबर २०२३ : नागपुरात एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरू आहे तर दुसरीकडे नागपुरातच आज तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळालं. शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वातील युवा संघर्ष यात्रा नागपुरातील विधानभवनावर धडकण्यापूर्वीच अडवण्यात आल्याचे पाहायला मिळाले. रोहित पवार यांच्या नेतृत्वातील युवा संघर्ष यात्रा ही राज्यभरात 800 किमीचा प्रवास करुन नागपुरात दाखल झाली. या संघर्ष यात्रेत आमदार रोहित पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते मात्र त्यांना रोखण्यात आले. पोलिसांकडून बॅरिकेट्स लावण्यात आले असतानाही युवा संघर्ष यात्रेतील कार्यकर्त्यांकडून बॅरिकेट्स तोडून विधानभवनाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा झिरो माईल चौकावर पोहोचला असता एकच गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले तर यावेळी कार्यकर्ते प्रचंड आक्रमकही झाले आहेत. ही सगळी परिस्थिती हातळताना पोलिस सतर्क होत त्यांनी रोहित पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनाही अडवलं आहे.

Published on: Dec 12, 2023 06:37 PM
देवेंद्र फडणवीस २०२४ ला सत्तेत नसणार, ही आमची गॅरंटी; संजय राऊत यांनी पुन्हा डिवचलं
तो माझा मेव्हणा नाही… माझ्या बँकेवर डंके की चोट पे म्हणत गुणरत्न सदावर्ते भडकले