वरळीतील जांबोरी मैदानात उद्या ठाकरे गटाचा निर्धार मेळावा, बघा कशी सुरूये तयारी
VIDEO | युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सभेसाठी वरळीत जय्यत तयारी, मुख्यमंत्री शिंदे यांच्या टीकेला काय देणार प्रत्युत्तर?
मुंबई : वरळीच्या जांबोरी मैदानात उद्या ठाकरे गटातील शिवसैनिकांचा निर्धार मेळावा आहे. या मेळाव्याची तयारी सध्या वरळीच्या जांबोरी मैदानात सुरू आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू असून या मैदानात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि ते स्वतः वरळीचे आमदार असल्याने ते निर्धार मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित करणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळीतील याच मैदानात जाहीर सभा घेतली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटावर त्यांनी टीका केली होती. या टीकेला आदित्य ठाकरे कोणते प्रत्युत्तर देतात का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. या ठाकरे गटाच्या निर्धार मेळाव्यात मोठ्या संख्येने हजर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Published on: Feb 25, 2023 04:48 PM