सिनेटमध्ये युवासेनेचा पहिला विजय, पाच उमेदवार विजयी अन्…; निकाल जाहीर होताच वरुण सरदेसाई यांची प्रतिक्रिया

| Updated on: Sep 27, 2024 | 5:04 PM

मुंबई विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत पदवीधारकांच्या जागांकरिता मंगळवारी 24 सप्टेंबर 2024 रोजी मतदान पार पडले होते. सध्या निवडणुकांच्या मतमोजणी सुरु आहे. या 10 जागांवरील निवडणुकीसाठी एकूण 28 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

Follow us on

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यास हळूहळू सुरुवात झाली आहे. या निकालानंतर आता युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. “मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया सुरु आहे. त्यात ज्या पाच राखीव जागा आहे, त्याची मतमोजणीही पूर्ण झालेली आहेत. त्यात ज्या मतांवर आक्षेप नोंदवण्यात आला, तेवढीच तांत्रिक बाब बाकी आहे. या पाचही जागांवर युवासेनेने निर्णायक आघाडी घेतली आहे. १० पैकी पाच जागा या युवासेना जिंकली आहे”, असे वरुण सरदेसाई यांनी सांगितले. पुढे ते असेही म्हणाले की, “यानंतर खुल्या गटाची मतमोजणी होईल. अर्ध्या तासात मुंबई विद्यापीठाकडून सर्व जागांचा निकाल जाहीर करेल. ओबीसी गटातून मयूर पांचाळ, एससी गटातून धनराज कोचाडे, महिला गटातून स्नेहा गवळी, एसटी गटातून शितल शेठ, एनटी गटातून शशिकांत खोरे या सर्वांनी पाच हजार मतांनी आघाडी घेतली आहे. तर आमच्या समोर प्रमुख प्रतिस्पर्धी असलेले अभाविप यांनी ८०० ते १००० मते घेतलेली आहे. त्यामुळे या पाच उमेदवारांना ४ हजारांची निर्णायक आघाडी घेऊन युवासेनेचे पाच उमेदवार हे विजयी झालेले आहेत.”, असेही वरुण सरदेसाई यांनी म्हटले.