‘…म्हणूनच ABVP चा सुपडासाफ’, सिनेट निवडणुकीवरुन संजय राऊतांकडून सरकारला लक्ष्य

| Updated on: Sep 29, 2024 | 11:44 AM

बहुचर्चित आणि वादात राहिलेल्या मुंबई विद्यापीठ सिनेटच्या विजयानंतर मातोश्रीवर जल्लोष झाला. पदवीधर निवडणुकीनंतर पदवीधरांनी सरकारला धडा शिकवल्याचा दावा करत संजय राऊतांनी सिनेट निवडणुकीवरुन सरकारला लक्ष्य केलं.

Follow us on

भाजपच्या अभाविप अर्थात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सुपडासाफ करत ठाकरे गटाच्या युवासेनेनं दहाच्या दहा जागांवर विजय मिळवला. निकालात भाजपच्या अभाविपचे उमेदवार विजयी मतांच्या जवळपास सुद्धा पोहोचू शकले नाहीत. राखीव प्रवर्गातल्या 5 जागांवर ठाकरे गटाच्या युवासेनेच्या एका उमेदवाराला जितकी मतं पडली., तितकी मतं पाचही उमेदवार एकत्रित करुनही अभाविप मिळवू शकलं नाही. मातोश्रीबाहेर मोठा जल्लोष करत युवासेनेनं मुंबई सिनेट निवडणुकीचा विजय साजरा केला. दुसरीकडे ईव्हीएम नव्हतं म्हणूनच भाजपप्रणित अभाविपचा सुफडासाफ झाल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. महिला प्रवर्गात ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या स्नेह गवळींना 5914 मतं पडली. अभाविपच्या रेणुका ठाकुरांना अवघी 893 मतं मिळाली, ओबीसीत युवासेनेच्या मयूर पांचाळांना 5350, तर विरोधातल्या राकेश भुजबळांना फक्त 888 मते मिळाली, एसटीत युवा सेनेच्या धनराज कोहचाडेंना 5247 मते, भाजपचे माजी मंत्री विष्णु सावरांच्या कन्या आणि अभाविपच्या उमेदवार निशा सावरांना अवघी 924 मतं पडली. एससी कोट्यात युवासेनेच्या शीतल देवरुखकरांना 5489 मते तर अभाविपच्या राजेंद्र सायगावकरांना 1014 मते मिळाली, व्हीजेएनटी प्रवर्गातून युवासेनेच्या शशिकांत झोरेंना 5247 मते, तर तर अभाविपचे अजिंक्य यादव फक्त 1066 मतं मिळवून पराभूत झाले.