Zika Virus : पुणेकरांनो… काळजी घ्या, झिकाच्या रूग्णांची संख्या 15 वर, ‘ही’ लक्षणं दिसताच सावध व्हा
पुण्यात झिकाचे 15 रुग्ण आढळले असून हा वाहक स्वरूपाचा व्हायरसने होणारा आजार आहे. गर्भवती महिलांचे रक्त नमुने जास्त संख्येने पाठवले असल्याने गर्भवती रुग्णांची संख्या जास्त आहे. गर्भवती महिलांच्या गर्भावर परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही गर्भवती महिलांचे रक्त नमुने जास्त घेत आहोत, पुणे महापालिकेच्या आरोग्यप्रमुखांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात झिका या व्हायरसचे रूग्ण वाढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांनी पुण्यात कोणती उपाययोजना घेतली जात आहे, त्याची माहिती दिली. पुण्यात झिकाचे 15 रुग्ण आढळले असून हा वाहक स्वरूपाचा व्हायरसने होणारा आजार आहे. गर्भवती महिलांचे रक्त नमुने जास्त संख्येने पाठवले असल्याने गर्भवती रुग्णांची संख्या जास्त आहे. गर्भवती महिलांच्या गर्भावर परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही गर्भवती महिलांचे रक्त नमुने जास्त घेत आहोत, असं त्यांनी सांगितले. पुढे त्या असेही म्हणाल्या, नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, घरी राहून उपचार घेऊ शकतात डासांची उत्पत्ती असणारे ठिकाण शोधून त्याठिकाणी औषध फवारणी केली जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तर ताप, अंगदुखी, सांधेदुखी, अंगावर डाग येणे अशी काही लक्षणं झिकाची आहेत. आजपर्यंत शहरात एकूण 15 झिकाचे रुग्ण आढळून आले आहेत, असे त्यांनी सांगितले.