ZP Elections | राज्यातील 6 जिल्हा परिषदांसाठी सरासरी 63 टक्के मतदान
या निवडणुकीसाठी भाजपचे मोठे नेते मैदानात प्रचारासाठी उतरले नाहीत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी कमान सांभाळली, तर दुसरीकडे काँग्रेसकडून मंत्री सुनील केदार यांनी एकहाती प्रचाराची बाजू सांभाळली. अनिल देशमुख प्रचारात नसल्याने राष्ट्रवादीची मोठी गोची झाली.
राज्यातील 6 जिल्हा परिषदांसाठी सरासरी 63 टक्के मतदान. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण रद्द केले. त्यानंतर आज नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांसाठी पोटनिवडणुकीचे मतदान पार पडले. जिल्हा परिषदेच्या 16 आणि पंचायत समितीच्या 31 जागांसाठी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी काही मतदान केंद्रांवर मतदारांची चांगलीच गर्दी बघायला मिळाली.
या निवडणुकीसाठी भाजपचे मोठे नेते मैदानात प्रचारासाठी उतरले नाहीत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी कमान सांभाळली, तर दुसरीकडे काँग्रेसकडून मंत्री सुनील केदार यांनी एकहाती प्रचाराची बाजू सांभाळली. अनिल देशमुख प्रचारात नसल्याने राष्ट्रवादीची मोठी गोची झाली. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आशिष देशमुख यांनी भाजप उमेदवाराचा प्रचार केल्याचाही मुद्दा या निवडणुकीत चांगलाच गाजला.