Corona Vaccine | 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीची क्लिनिकल चाचणी पूर्ण
भारतातील आघाडीची औषध कंपनी झायडस कॅडिलाच्या (Zydus Cadila) 12 ते 18 वर्षे वयोगटासाठीच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या क्लिनिकल ट्रायल पूर्ण केल्या आहेत.
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार आणि तिसऱ्या लाटेची शक्यता यामुळे भारतातही लहान मुलांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील आघाडीची औषध कंपनी झायडस कॅडिलाच्या (Zydus Cadila) 12 ते 18 वर्षे वयोगटासाठीच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या क्लिनिकल ट्रायल पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे येत्या महिनाभरात ही लस लवकरच उपलब्ध होईल, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. त्यामुळे लहान मुलांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.