नंदुरबार : राज्य सरकारकडून (Maharashtra government) शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा (1 rupee crop insurance) देण्यात येत आहे. शेतकऱ्यांकडून एक रुपया घेऊन पीक विम्याचा लाभ देण्यात येणार आहे. पीक विम्यातून पपई आणि मिरची पिकाला यातून वगळ्यामुळे काय करावं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. काही शेतकऱ्यांनी (farmer news) आमदारांची भेट घेतली. परंतु सकारात्मक चर्चा न झाल्यामुळे शेतकरी संतप्त झाल्याचे पाहायला मिळतं आहे. १ रुपयात पीक विमा मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण होतं. परंतु महत्त्वाची पीक वगळ्यामुळे शेतकरी निराश झाले आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात पपई आणि मिरची पीक अधिक घेतलं जातं. पपई आणि मिरची या पिकांना पीक विम्यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून मिळत असलेल्या एक रुपयात पीक विमा योजनेच्या लाभापासून नंदुरबार जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना वंचित रहावं लागणार हे निश्चित झालं आहे.
भाजपाचे आमदार राजेश पाडवी यांनी सरकारकडे पपई आणि मिरची उत्पादक शेतकऱ्यांना लाभ देण्याची मागणी केली आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या शेतकरी संकटात सापडला आहे. आगोदर अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसान झालं होतं. दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झालाय, तरी मुसळधार पाऊस जिल्ह्यात झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान उभे राहणार आहे. सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा देऊन मदत करावी. परंतु जिल्ह्यातील प्रमुख पीक पपई आणि मिरची पीकाला वगळल्याने शेतकऱ्यांनी करावं तरी काय असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे आमदार राजेश पाडवी यांनी सरकारकडे केलेली मागणी मान्य करावी.
जुलै महिन्यात महाराष्ट्रातील लोकांना अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळाला. पंरतु ऑगस्ट महिना सुरु झाल्यानंतर पावसाचं प्रमाण महाराष्ट्रातील काही भागात कमी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी प्रमाणात असेल अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील अधिक धरण ही जुलै महिन्यातील पावसाने भरली आहे. काही धरण भरण्याच्या उंबठ्यावर आहेत. त्यामुळं पुढच्या काही दिवसात मुसळधार पाऊस झाल्यास धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात येणार आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर पीकाचं नुकसान होण्याची शक्यता असते.