देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानीचे शहर असलेल्या मुंबईच्या सीमेला लागूनच ठाणे जिल्हा आहे. रस्ते आणि लोकल वाहतुकीमुळे हा जिल्हा झपाट्याने विकसित झाला आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा जिल्हा असल्याने या जिल्ह्याचे अलिकडेच विभाजन झाले आणि ठाण्यापासून स्वतंत्र अशा पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. ठाणे जिल्ह्याची विविध अर्थाने ओळख आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी सर्व मोठी तलावे ही याच जिल्ह्यात आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार ठाणे हा लोकसंख्येच्या दृष्टिने राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ 4214 चौ.कि.मी. असून ते राज्याच्या 1.37 टक्के आहे. पूर्वेकडे सहयाद्री पर्वताच्या रांगा तर पश्चिमेस अरबी समुद्र, उत्तरेस गुजरात राज्याचा घनदाट अरण्याचा भाग आणि दक्षिणेला मुंबई शहर अशी ठाण्याची सीमा आहे. जिल्हयातील ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकास झाला आहे. राज्याच्या 720 कि.मी. किनाऱ्यांपैकी 27 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा जिल्हयाला लाभला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक कुटुंबांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. पर्यटनस्थळांची संख्याही अधिक असून अनेक महत्वाची धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे पर्यटकांची वर्दळ तितकीच असून त्याची स्थानिकांच्या रोजगारासाठी मोठी मदत होत आहे. ठाण्यात भिवंडी ग्रामीण, शहापूर, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण ग्रामीण, मुरबाड, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याणपूर्व, डोंबिवली, कल्याण पश्चिम, मीरा भाईंदर, ओवळा माजीवडा, कोपरी-पाचपाखाडी, ठाणे शहर, मुंब्रा-कळवा, ऐरोली आणि बेलापूर हे 18 मतदारसंघ येतात.
जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.
पुढे वाचा