मुंबईच्या जवळच असलेल्या नवी मुंबईला दुसरी मुंबई समजलं जातं. जेमतेम 40 वयोमान असलेलं हे शहर असून अत्यंत नियोजनद्धरित्या वसवलेल्या शहरांपैकी एक शहर आहे. 1958मध्ये नवी मुंबई निर्माण करण्याचा पहिला विचार आला. त्यानंतर सुमारे 12 वर्षाने हे शहर वसविण्यास सुरुवात झाली. मुंबईतील लोकसंख्या रोखण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून या शहराची निर्मिती केली गेली. 350 किलोमीटर क्षेत्रफळावर वसलेलं हे शहर आहे. या शहराची लोकसंख्या 20 लाखाच्या पुढे आहे. आगरी, कोळी समाजाची या शहरात सर्वाधिक लोकसंख्या आहे. नवी मुंबई महापालिकेने मोरबे धरण बांधले. मुंबई महापालिकेनंतर स्वत:चं धरण बांधणारी नवी मुंबई महापालिका दुसरी ठरली आहे. नवी मुंबईत शाळा आणि महाविद्यालयांची रेलचेल असल्याने या शहराला एज्युकेशन हबही म्हटलं जातं. टेक्नॉलॉजीचं शहर म्हणूनही या शहराची ओळख निर्माण होत आहे. त्याशिवाय या शहरात रुग्णालयांचं जाळंही निर्माण करण्यात आले आहे. रिलायन्स समूहाची मुख्यालये याच शहरात आहेत. एमपीएमसी ही सर्वात मोठी बाजारपेठ याच शहरात आहे. स्टील, लोखंड बाजार, जेएनपीटी यांसारखे मोठे उद्योग नवी मुंबईत आहेत. तसेच अनोख्या पद्धतीने बांधलेल्या रेल्वे स्टेशनमुळेही हे शहर सर्वांचे आकर्षण ठरलं आहे. चकचकीत रस्ते आणि स्वच्छतेमुळेही या शहरांत राहण्यासाठी पसंती दिली जाते.
नवी मुंबईतील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.
पुढे वाचा