नाशिक या नावाचा उगम रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. त्यानुसार लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक कापले. त्यामुळे या जागेचे नाव ‘नासिक’ असे पडले. महाराष्ट्र सरकारने बदलून ते नाशिक केले. नाशिक आणि पंचवटी या दोन भागांतून जी गोदावरी नदी वाहते ती नऊ टेकड्यांच्यामधून वाहते म्हणजे ‘नव शिखां’मधून वाहते. शिखा या संस्कृत शब्दाचा अर्थ टेकडी असा होतो. त्यावरून ‘नव शिखा’ नगरी वरून नाशिक झाले. नाशिक जिल्हा समुद्रसपाटीपासून 565 मीटर उंचीवरील महाराष्ट्राच्या उत्तरपश्चिम भागांमध्ये आहे. येथील लोकसंख्या 61,09,522 आहे, तर क्षेत्रफळ 15,582 चौ.कि.मी. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. नाशिक शहरात महापालिकेमध्ये 6 विभाग आहेत. (नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक रोड, सिडको, सातपूर, अंबड). नाशिक जिल्ह्यात महसूल उप-विभाग 9 आहे. तहसील 15 आहे. महसूल मंडळांची संख्या 92 आहे. दोन महानगरपालिका आहेत. एकूण 9 नगरपरिषद आणि 6 नगर पंचायत आहेत. शहरी पोलीस ठाणे 13 तर ग्रामीण पोलीस ठाण्यांची संख्या 40 आहे. जिल्ह्यात एकूण 1383 ग्रामपंचायती आहेत. एकूण गावे 1960 आहेत. जिल्ह्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. नाशिक जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत. नाशिक जिल्ह्यात विधानसभेचे 15 व आणि लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. ऐतिहासिक काळापासून नाशिकची धार्मिक स्थळ ही ओळख आहे. रामायणात नाशिक परिसरातील ‘पंचवटी’ येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे. मोगल साम्राज्याच्या काळात नाशिक ‘गुलाबांचे शहर’ म्हणून ‘गुलशनाबाद’ या नावाने ज्ञात होते. नाशिक हे आंबेडकरी चळवळीचे प्रमुख केंद्र आहे. दादासाहेब गायकवाड यांचा जन्म ह्याच भूमीत झाला. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळ्याचे क्षेत्र नाशिक आहे. 1200 सालाच्या सुमारास खोदलेली पांडवलेणी आहेत. गोदावरी नदीला नाशकात दक्षिण गंगा म्हणतात. वीर सावरकर, अनंत कान्हेरे, लोकमान्य टिळक, दादासाहेब पोतनीस, बाबूभाई राठी, व्ही.व्ही. शिरवाडकर आणि वसंत कानेटकर यांच्यामुळे नाशिकची सर्वदूर कीर्ती झालीय.
नाशिकच्या राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही 9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.
पुढे वाचा