नागपूर ही महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात होतं. देशात 13 व्या क्रमांकाचं हे लोकसंख्येच्या दृष्टीने हे मोठे शहर आहे. 2011 च्या जनगणनेनुसार नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या 46 लाख 53 हजार 570 आहे. जिल्ह्यात 14 तालुके आहेत. मराठी व्यतिरिक्त हिंदी आणि झाडीपट्टीची मराठी भाषा येथे मोठ्या प्रमाणात बोलली जाते. नागपूर आणि रामटेक असे 2 लोकसभा मतदारसंघ आहेत. तसेच जिल्ह्यात 12 विधानसभा संघ आहेत. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. नागपुरातील झिरो मैल हे देशाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय येथे आहे. आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली दीक्षाभूमी नागपुरातच आहे. फुटाळा, अंबाझरी, शुक्रवारी अशी तलाव आहेत. नागपूर हे संत्रानगरी तसेच टायगर कॅपीटल म्हणून प्रसिद्ध आहे. स्वामीनारायण, गणेश टेकडी अशी मंदिर आहेत. शहरातून नाग नदी वाहते.
नागपुरातील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.
पुढे वाचा