जितेंद्र बैसाणे : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात मार्च महिन्यात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपिटीमुळे शेती पिकांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. तर त्यासोबतचं चाऱ्याचे देखील मोठे नुकसान झाले होते, आता गुराढोरांसाठी चारा टंचाई निर्माण होणार आहे. अवकाळी पावसामुळे चाऱ्याच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आता नवीनच समस्या उद्भवणार आहे. शेतकरी दरवर्षी वर्षभरासाठी गुराढोरांसाठी चारा साठवणूक करून ठेवतात. मात्र यंदा अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या (farmer news) अतोनात नुकसान केलं आहे. तर गुरांना लागणारा चारा देखील खराब झाला असल्याने शेतकऱ्यांना चारा टंचाईला सामोरे जावा लागणार आहे. त्यामुळे शासनाने चारा उपलब्ध करून द्यावा अशीच काहीसी मागणी आता शेतकरी राजा करू लागला आहे.
शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याने यंदा नंदुरबार जिल्ह्यात विक्रमी आवक झाली आहे. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत ७५ हजार क्विंटल कापसाची आवक झाल्या असून, हंगाम लांबला असून आणखी काही दिवस हंगाम सुरू राहणार असल्याने आवक वाढण्याची शक्यता आहे. मागील वर्षी कापसाची ५५ हजार क्विंटल आवक झाली होती. मात्र यावर्षी आवक चांगली वाढली आहे. कापसाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवणूक करून ठेवला होता, मात्र आता हळूहळू शेतकरी कापूस विक्री करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होत आहे. मागील वर्षी कापसाला सोन्यासारखा भाव मिळाला असल्यामुळे यंदा कापसाची आवक प्रचंड वाढली आहे. परंतु शेतकऱ्यांना कापसाला अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीच्या सूर आहे. परंतु कापूस किती दिवस घरी ठेवणार त्यासाठी कापूस विक्रीकडे शेतकऱ्यांच्या कल अधिक वाढला आहे.
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याच्या घटना घडत आहेत. बुधवारी रात्री शेतकऱ्यांनी भुईमुगाच्या शेंगा विक्रीसाठी आणल्या होत्या. मात्र व्यापाऱ्यांच्या थप्प्या मोंढ्यात असल्यामुळे शेतकऱ्यांना पोते टाकण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे व्यापाऱ्याने मुजोरी करत चक्क गेट बंद करून शेतकऱ्यांचा माल बाहेर ठेवला. मात्र शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना जाब विचारल्यानंतर व्यापाऱ्याने नरमाईची भूमिका घेऊन गेट उघडले. बाजार समितीच्या दुर्लक्षामुळे हिंगोलीच्या मोंढ्यात व्यापाराची मुजोरी वाढल्याचे पहावयास मिळत आहेत.