नवी दिल्ली : शेतकरी पारंपरिक शेतीसोबत भाजीपाला लागवड आणि फळबाग लागवडीकडे वळत आहेत. कोणी हिरव्या भाजीपाल्याची शेती करतो, तर कोणी मशरूम, पपईची लागवड करतो. यातून काही शेतकरी करोडपती झाले आहेत. उत्तरप्रदेशातील काही शेतकऱ्यांनी परदेशी पिकांचीही शेती करत आहेत. यातून ते लाखो रुपयांची कमाई करत आहेत. त्यापैकी एक प्रगतशील शेतकरी आहेत सफीक भाई. सफीक भाई हे मुजफ्फरपूर जिल्ह्यातील भोपा येथील रहिवासी आहेत. सफीक भाई गेल्या दहा वर्षांपासून स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतात.
सफीक भाई मुरादनगरच्या गंगनहरजवळ स्ट्रॉबेरीची शेती करतात. ११ बीघे जमिनीत स्ट्रॉबेरीची शेती करतात. यातून त्यांना चांगला नफा झाला आहे. त्यामुळे त्यांनी ४० बिघे जमिनीतून स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले. विशेष म्हणजे स्ट्रॉबेरीची विक्री ते स्वतः करतात. गेल्या दहा वर्षांपासून ते शेताच्या समोर स्ट्रॉबेरीचा स्टॉल लावून विक्री करतात. दुसऱ्या जिल्ह्यातील लोकं त्यांच्या स्टॉलवर स्ट्रॉबेरीची खरेदी करण्यासाठी येतात.
सफीक भाई म्हणतात, स्ट्रॉबेरी शेतीमध्ये खूप मेहनत आहे. परंतु, यात नफासुद्धा जास्त आहे. आतापर्यंत ते स्ट्रॉबेरी विकून एक कोटी रुपयांची कमाई करत आहेत. स्ट्रॉबेरीची शेती ते आधुनिक पद्धतीने करत आहेत. स्ट्रॉबेरी काढण्यासाठी ते मल्चिंगचा वापर करतात. दरवर्षी ते ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात लागवड करतात. स्ट्रॉबेरीचे उत्पादन सहा महिन्यांमध्ये तयार होते. जास्त पाऊस झाल्यास स्ट्रॉबेरीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे स्ट्रॉबेरीच्या शेतीत पाणी काढण्याची व्यवस्था असावी लागते.
सफीक फाई हिरव्या भाजीपाल्याची शेती करत होते. परंतु, त्यांना पाहिजे तसा नफा मिळत नव्हता. एक वेळा त्यांचे मोठे भाऊ हिमाचल प्रदेशात एकदा गेले होते. त्यांनी तिथं स्ट्रॉबेरीची शेती पाहिली. त्यानंतर स्ट्रॉबेरीची शेती सुरू केली. सुरुवातीला दोन बिघे जमिनीत स्ट्रॉबेरी लावली. चांगली कमाई झाल्याने त्यांचे मनोबल वाढले. त्यानंतर त्यांना स्ट्रॉबेरी लागवडीचे क्षेत्र वाढवले. आता ते ११ बिघे जमिनीत स्ट्रॉबेरीची शेती करतात. सफीक भाई यांनी स्ट्रॉबेरी उत्पादनातून आतापर्यंत दीड कोटी रुपयांची कमाई केली.
स्ट्रॉबेरीची ते कॅमरोज व्हेरायटीची शेती करतात. २०० रुपये किलो स्ट्रॉबेरी विकतात. दिल्ली आणि मेरठच्या बाजारात सफीक भाई १०० ते १२५ रुपयांच्या भावाने ठोकमध्ये स्ट्रॉबेरी विकतात. एक बिघा शेतीत स्ट्रॉबेरीची सहा हजार झाडं लावली जातात. कॅमरोज जातीचा एक रोप सहा ते आठ रुपयांना मिळतो. एक बिघा स्ट्रॉबेरीची शेती केल्यास ७० ते ७५ हजार रुपये खर्च येतो. सहा महिन्यानंतर फायदा होतो.