बुलाडाणा : राज्यातील शेतकऱ्यांना झालंय तरी काय ? अंस विचारण्यामागे कारणंही तशीच आहेत. आता दोन दिवसांपूर्वीच हिंगोली जिल्ह्यातील एका (Small holder farmer) अल्पभूधारक शेतकऱ्याने शेती परवडत नाही म्हणून चक्क हेलिकॉप्टर घेण्यासाठी भारतीय स्टेट बॅंकेकडे तब्बल 6 कोटी 65 लाख रुपये कर्जाची मागणी केली होती. आता हे कमी म्हणून की काय (Buldhana) बुलडाण्यातील अनोखाच प्रकार समोर आलायं. म्हणे सध्याच्या (Politics) राजकीय घडामोडीमुळे फाईव्ह स्टार हॉटेल्सला अधिकचे महत्व आले आहे. त्यामुळे शेतीत काय राम नाही म्हणत चांगेफळच्या बहाद्दर शेतकऱ्यांने बॅंक ऑफ इंडियाकडे 5 कोटी 50 लाखाच्या कर्जाची मागणी केलीय. शुभंम ने हा (Five Star Hotel) हॉटेल उभारणीचा शुभ योग जुळवून आणण्यासाठी अनेक वेळा बॅंकेचे उंबरठे झिजवले आहेत. आता त्याची मागणी पाहून बॅंक अधिकारीही चक्रावून गेली आहे. त्यामुळे शेतीला त्रासून शेतकरी कोणता विचार करीत आहेत याचाही प्रत्यय समोर येतोय हे नक्की.
सध्या पंचतारांकित हॉटेल चर्चेक आहेत ती राजकीय परस्थितीमुळे. मध्यंतरीच राज्यसभा निवडणुकीच्या दरम्यान राज्यातील आमदारांना मुंबई येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. काही दिवस आमदारांचा मुक्काम हा अलिशान अशा हॉटेल्समध्ये होता. आता विधान परिषेदच्या निवडणुका पार पडत असताना पुन्हा आमदारांचा मुक्काम हा पंचतारांकित हॉटेल्समध्येच आहे. त्यामुळे दिवसेंदिवस हॉटेल्सच महत्व वाढत आहे. तर दुसरीकडे शेती उत्पादनातून कमाई तर सोडाच निसर्गाच्या लहरीपणामुळे व्यवसायच कऱणे अवघड झाल्याने बुलाडाणा जिल्ह्याातील शुभंम इंगळेने अशाप्रकारच्या कर्जाची मागणी केली आहे.
शुभंम इंगळे हा बुलडाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ गावातील अल्पभूधारक शेतकरी आहे. गेल्या काही दिवसांपासून तो शेती व्यवसयात राबत आहे पण त्याला अपेक्षित उत्पादन मिळालेले नाही. त्यामुळे शेती हा व्यवसाय तोट्यात आला आहे. यामध्येच निसर्गाचा लहरीपणा अडचणीचा ठरत असल्याने त्याने वेगळी वाट निवडण्याचा निर्णय घेतला पण त्याच्या या अनोख्या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याला जिल्ह्यातच हे फाईव्ह स्टार हॉटेल उभा करायचे आहे.
आता कोट्यावधीचे कर्ज म्हणजे फडावे कसे असा सवाल तर होणारच की पण शुंभमचा तो ही फार्म्युला तयार आहे. आता जसे राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांच्या अनुशंगाने आमदारांना या फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये ठेवले जाते. त्याच प्रमाणे विभानसभा सदस्यांच्या निवडणुकांमध्येही राजकीय पक्ष हे या भागातील ग्रामपंचायत सदस्य , पंचायत समिती ,जिल्हा परिषद सदस्य यांना माझ्या हॉटेल मध्ये आश्रयास ठेवतील आणि त्यातून मला उत्पन्न मिळाले की मी बँकेच कर्ज परतफेड करेल असा त्याचा दावा आहे. त्याच्या कर्जाच्या मागणीने बॅंक अधिकारीही चक्रावले आहेत.