मुंबई : पीएम किसान योजनेच्या (PM kisan yojana) माध्यमातून केंद्र सरकार (central government) शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये पाठवते. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर चार महिन्यातून एकदा हे पैसे जमा होतात. वर्षातून तीनवेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतात. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या (latest farmer news in marathi) खात्यावर १३ हप्ते आले आहेत. १४ व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत.
पीएम किसान योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असल्यास ई केवायसी करणं अधिक गरजेचं आहे. समजा तुम्ही अजूनही ईकेवायसी केली नसेल, तर यापुढे तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार नाही. परंतु अजून त्यासाठी संधी उपलब्ध आहे. तुम्ही पीएम किसान पोर्टलवरती जाऊन ई केवायसी करु शकता. त्याचबरोबर तुम्ही सीएससी केंद्रावर जाऊन सुध्दा ही सगळी माहिती भरू शकता.
सुरुवातीला तुम्हाला पीएम किसान वेबासाईटवरती जावं लागेलतिथं तुम्हाला समोरचं ईकेवायसी असा ऑप्शन दिसेल
तिथं तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकावा लागेल. त्यानंतर सर्चवरती क्लिक करावं लागेल.
त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती आलेला ओटीपी तिथं द्यावा लागतो
त्यावेळी तुमची ईकेवासीची प्रक्रिया पुर्ण होते.
या योजनेचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड, त्याचबरोबर त्यांचं बँकेत खातं असणं गरजेचं आहे. जमीनीचे कागद, रहिवासी दाखला, त्याचबरोबर जमीनीची पडताळणी करणं सुध्दा गरजेचं आहे. वरीलपैकी एक जरी डॉक्युमेंट नसलं तरी त्या व्यक्तीला पीएम किसान योजनेचा फायदा मिळू शकत नाही.