गोंदिया : गोंदियात (Gondia) एका शेतकऱ्याने (Farmer) किमया करत आपल्या 22 एकरात स्ट्रॉबेरी (Strawberry Cultivation) फुलविली असून त्यातून तो शेतकरी लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहे. दरम्यान पारंपारिक धान शेतीला फाटा देत स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेतल्याने इतर धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रेरणा ठरत आहे. अनेक शेतकरी शेती पाहण्यासाठी येत आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्याचं कौतुक देखील करीत आहेत. तसेच अनेकांनी अशा पद्धतीची शेती करायला हवी अशा पद्धतीची चर्चा सध्या तिथल्या परिसरात सुरु आहे.
गोंदिया शहरापासून जवळच असलेल्या चारगाव येथे प्रयोगशील शेतकरी संजय जसाणी हे त्यांच्या 22 एकर शेतीत भाजीपाल्यासह विविध पीक घेतात. स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रुट यासारखे नवनवीन फळ लागवडीचे प्रयोगही कृषी विभागाच्या मार्गदर्शनात केली जाते. नव्यानेच 22 एकर जागेत 4500 स्ट्रॉबेरी रोपांची लागवड केली आहे. त्यापासून त्यांनी स्ट्रॉबेरीचे उत्पन्न सुरु केले. 200 ग्रॅमच्या डब्याची पॅकींग करुन गोंदियाच्या बाजारात विक्री करीत आहेत. स्ट्रॉबेरीचे 1.5 टन उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. पुढील वर्षी स्ट्रॉबेरी क्षेत्रात वाढ करण्याची इच्छाही संजय जसाणी यांनी मिळता नफा पाहून व्यक्त केली असल्याची माहिती दिली आहे.
शेतकऱ्याचे चांगल्या पद्धतीने शेती करुन लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविल्याने त्याची सगळीकडे चर्चा आहे. त्याचबरोबर भविष्यात सुध्दा अशा पद्धतीची शेती करणार असल्याचे शेतकऱ्यांनी जाहीर केले आहे. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीचा प्रयोग शेतीमध्ये केल्याचा पाहायला मिळतो.
गोंदिया जिल्ह्यात १५ ते १९ या कालावधीत विजेचा कडकडाट व वादळवा-यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाने आपला तडाखा वाढविला आहे. फेब्रुवारी महिन्यात पारा ३६ अंशावर गेला होता. त्यात आता होळी जळाली असून मार्च महिना मध्यात आला असतानाच पारा परत एकदा ३६ अशांवर गेला आहे. उन्हाचा तडाखा वाढत असतानाच होळीच्या दिवसांपासून जिल्हयात ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. त्यात आता हवामान खात्याने येत्या १५ ते १९ या पाच दिवसांत विजेचा कडकडाट व वादळवा-याचा अंदाज वर्तविला आहे. यामध्ये १५ व १६ तारखेला विजेचा कडकडाट तर १७ व १९ तारखला वादळवारा व विजेच्या कडकडाटात अंदाज वर्तविला आहे.