चंद्रपूर: राज्यभरात नैसर्गिक संकटे आणि अतिवृष्टीमुळे बळीराजा हताश झाला असतानाच आता चंद्रपूरात एक चीड आणणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी कृषी केंद्राकडूनच शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. कृषी केंद्रावरून देण्यात येत असलेल्या खतांमध्ये मोठ्याप्रमाणावर भेसळ आणि गैरव्यवहार होत असल्याचा संशय आहे.
प्राथमिक माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील शंकरपूर येथील एका कृषी केंद्रावर हा प्रकार घडला आहे. या भागातील शेतकऱ्यांनी कृषी केंद्राच्या संशयास्पद कारभाराविरोधात तक्रार नोंदवली होती. याठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या खतांच्या पिशव्या कमी वजनाच्या असतात. तसेच या खतांमध्ये भेसळ झाल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला होता. खतांमध्ये भेसळ करण्यासाठी माती आणि चुन्याचा वापर होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे.
याशिवाय, शेतकऱ्यांना खत खरेदीनंतर कच्ची बिलं दिली जातात. त्यामुळे याठिकाणी मोठ्याप्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर या कृषी केंद्रावरील खताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कृषी केंद्रावरील खतांचे काही नमुने घेत ते तपासणीसाठी अमरावती येथे प्रयोगशाळेत पाठवले. त्यामुळे आता याप्रकरणात पुढे काय कारवाई होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पारंपारिक पिकातून भरघोस उत्पादन मिळत नाही म्हणून आता मराठवाड्यातील शेतकरीही आधुनिक शेतीकडे लक्ष केंद्रीत करीत आहे. पण कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी बाजारात मिळत नसलेला दर यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. (Farmer) शिरुरअंतपाळ तालुक्यातील येरोळ येथील शेतकऱ्याने दोन एकरामध्ये पपईचे उत्पादन घेतले होते. नैसर्गिक समस्यांना तोंड देत त्यांनी मोठ्या कष्टाने दिड हजार झाडे जोपासली पण आता पपईला कवडीमोल दर मिळत असल्याने तोडणीला आलेली (papaya) पपई आता वावरातच गळून पडत आहे. त्यामुळे पारंपारिक मिळणारे पीकही गेले आणि या झाडांसाठीच खर्चही वाया गेल्याची शेतकऱ्याची भावना झाली आहे.
सोयाबीन, उडीद पिकाने उत्पन्न मिळत नसल्याने येरोळ येथील पाशा गफुरसाब कोतवाल यांनी ऑक्टोंबर महिन्यात दोन एकरामध्ये दिड हजार पपईच्या रोपांची लागवड केली होती. लागवडीपासूनच खताची फवारणी, मर्यादीत पाणी याचे त्यांनी नियोजन केले. य़ाशिवाय मध्यंतरीच्या ढगाळ वातावरणामुळे या झाडांवर किडीचा प्रादुर्भाव झाला त्यावेळी हजारो रुपये खर्च करुन झाडांची जोपासना केली होती.
परीश्रम आणि योग्य नियोजन यामुळे या पिकातून चार पैसे पदरी पडतील अशी आशा कोतवाल यांना होती. पण ऐन फळ तोडणीच्या प्रसंगी पपईचे दर पडले आहेत. व्यापाऱ्यांनी तर 4 रुपये किलोप्रमाणे मागणी केली आहे. शिवाय आता पाऊस झाल्यानंतर व्यापारीही फिरकाना झाले आहेत. दोन एकरावरील पपई जोपासण्यासाठी कोतवाल यांना दोन लाखाचा खर्च आला आहे.
आता फळ काढणीला आले असताना मागणी नसल्याने पपई गळून वावरातच पडत आहे. दरवर्षी पारंपारिक पिकातून उत्पादनावरील खर्च तरी निघत होता. पण या प्रयोगामुळे कोतवाल यांचे दुहेरी नुकसान झाले आहे.
संबंधित बातम्या:
शेतकऱ्यांनो महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करा अन् रब्बीचे बियाणे मिळवा, हरभऱ्यावर अधिकचा भर
आघाडी सरकारची शिफारस शेतकऱ्यांसाठी घातक : डॉ. अनिल बोंडे ; एफ.आर.पी. रकमेवरून राजकारण
महाराष्ट्र – बिहार दरम्यान किसान रेल्वेची सेवा ; शेतकऱ्यांना 50% पर्यंत अनुदान