Kokan : जे आंब्याचे तेच काजू बांगाचे, 30 टक्केच उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी

| Updated on: Mar 26, 2022 | 10:37 AM

निसर्गाच्या कचाट्यातून यंदा एकाही पिकाची सुटका झालेली नाही. विदर्भ, मराठवाड्यात खरीप हंगामासह रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे तर दुसरीकडे कोकणात फळबागांचे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका हा आंबा फळबागांना बसलेला आहे. हंगाम सुरु झाल्यापासून अवकाळी, ढगाळ वातावरण याचा कायम परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा 25 टक्केच उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले आहे. जे आंबा फळपिकाच्या बाबतीत झाले तेच आता काजूच्या बाबतीत होताना पाहवयास मिळत आहे.

Kokan : जे आंब्याचे तेच काजू बांगाचे, 30 टक्केच उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी
यंदा वातावरणातील बदलामुळे काजू बीचे उत्पादन घटले आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

रत्नागिरी : निसर्गाच्या कचाट्यातून यंदा एकाही पिकाची सुटका झालेली नाही. विदर्भ, मराठवाड्यात खरीप हंगामासह रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे तर दुसरीकडे (Kokan) कोकणात (Damage to orchards) फळबागांचे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका हा आंबा फळबागांना बसलेला आहे. हंगाम सुरु झाल्यापासून अवकाळी, ढगाळ वातावरण याचा कायम परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा 25 टक्केच उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले आहे. जे आंबा फळपिकाच्या बाबतीत झाले तेच आता (Cashew Farm) काजूच्या बाबतीत होताना पाहवयास मिळत आहे.सुरवातीच्या टप्प्यात आलेला मोहर वाया गेला आहे तर आता उशिराने आलेल्या मोहरातून उत्पादन मिळण्यास सुरवात झाली आहे. मात्र, यामधूनही 30 टक्केच उत्पादन मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ढगाळ वातावरणामुळे काजू बी वर परिणाम

अवकाळी, ढगाळ वातावरणाचा परिणाम हा सर्वच पिकांवर झाला आहे. त्याप्रमाणे कोकणातील फळबागांचे अस्तित्वच कमी झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे काजू बी वर अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे बीचा दर्जा घसरला आहे. अनेक ठिकाणी तर बीचा गरच तयार झाला नाही. सध्याच्या वाढत्या उन्हामुळे आता काजूचे बोंडू तयार होण्यापूर्वीच बी सुकले आहे. त्यामुळे बदलत्या वातावरणाचा विपरीत परिणाम हा काजू उत्पादनावर झालेला आहे. यामधून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना आता आगामी हंगामाचीच वाट पहावी लागणार आहे.

यंदा उत्पादनही दोनच महिनेच

दरवर्षी काजूचे उत्पादन हे तीन महिने मिळते. पण यंदा हंगामाच्या सुरवातीचा मोहर तर वायाच गेला. त्यामुळे उशिरा आलेल्या मोहरातूनच उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले आहे. उत्पादनात तर घट झालीच आहे शिवाय यंदा केवळ दोनच महिने हंगाम सुरु राहणार असल्याचे संकेत आहेत. कोकणात यंदा आंबा, काजू या मुख्य पिकांवरच परिणाम झाला असून अर्थकारणही बिघडणार आहे. यातच पहिल्या बहरातील काजू संपला असून शेतकऱ्यांना दुसऱ्या बहराची प्रतिक्षा लागली आहे.

शेतकऱ्यांना आता मदतीची प्रतिक्षा

प्रतिकूल परस्थितीमुळे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित विमा कंपन्यांनी परस्थितीचा अभ्यास करुन निर्णय घेणे हे गरजेचे झाले आहे. विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत हा एकच पर्याय आता शिल्लक आहे. परस्थितीचा अभ्यास करुन वेळप्रसंगी निकष बनवले तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

संबंधित बातम्या :

Cotton Crop : पुन्हा पांढऱ्या सोन्याने बहरणार शिवार, घटलेले क्षेत्र कशामुळे वाढणार?

PM kisan Yojna : शेतकऱ्यांना दिलासा, e-KYC बाबत सरकारचा मोठा निर्णय..!

Cotton Rate | अकोट बाजार समितीत कापसाला विक्रमी भाव, कापसाला मिळाला 12 हजार रुपये Rate