नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याची दीर्घ काळापासून प्रतिक्षा आहे. मागील वर्षी 25 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 वा हप्ता जाहीर केला. तेव्हापासून शेतकरी आठव्या हप्त्यासाठी 2000 हजार रुपयांच्या प्रतिक्षेत आहेत. मे महिन्यात कोणत्याही दिवशी पंतप्रधान किसान सन्मान निधीचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो अशी चर्चा आहे. यावेळी फसवणूक करुन या योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकर्यांच्या खात्यात पैसे जाणार नाहीत. आपण आपले नाव सूचीमध्ये तपासू शकता. (After this date, the eighth installment of Kisan Sanman Nidhi will come, Check your name)
– आपले नाव तपासण्यासाठी आपण प्रथम पंतप्रधान किसान सन्मान निधी (pmkisan.gov.in) च्या अधिकृत वेबसाइटवर जावे.
– येथे उजव्या बाजूला एक फार्मर्स कॉर्नर आहे. तिसर्या क्रमांकावर लाभार्थी स्थितीचा कॉर्नर आहे.
– लाभार्थी स्थितीवर क्लिक केल्यास एक विंडो ओपन होईल.
– त्यामध्ये आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि मोबाइल नंबरची माहिती प्रविष्ट करा आणि गेट डेटावर क्लिक करा.
– गेट डेटा क्लिक केल्याने शेतकऱ्याशी संबंधित सर्व माहिती ओपन होईल. आतापर्यंत किती हप्ता पाठविला गेला आहे व कोणत्या तारखेला आहे याची यादी तिथे नोंदविली गेली आहे.
– आता आपल्याला आगामी हप्त्याचा कॉलम पहावा लागेल. यामध्ये वेटिंग फॉर अप्रूवल बाई स्टेट लिहिले असेल तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला आता प्रतीक्षा करावी लागेल. राज्य सरकारची परवानगी मिळाल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे येतील.
– आएफटी साईन्ड बाय स्टेट गव्हर्नमेंट लिहिले असेल तर याचा अर्थ असा आहे की शेतकऱ्यांचा डेटा तपासला गेला आहे.
– एएफटीओ इज जनरेटेड अँड पेमेंट कंन्फर्मेशन इज पेंडिंग असे लिहिले असेल तर याचा अर्थ आपल्याला आपल्या खात्यात लवकरच पैसे मिळू शकतात.
पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या अंतर्गत दरवर्षी 2-2 हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठविले जातात. आठव्या हप्त्यासाठी केंद्र सरकारने पूर्ण तयारी केली आहे. तथापि, पाच राज्यांमधील निवडणुका आणि कोरोना संसर्ग वाढण्याच्या घटनांमुळे पैसे देण्यास विलंब होत आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल 2 मे रोजी येईल. 2 मे नंतर कोणत्याही दिवशी पंतप्रधान दोन हजार रुपयांचा आठवा हप्ता शेतकऱ्यांना जाहीर करु शकतात अशी चर्चा आहे. तथापि, पैसे पाठविण्याची तारीख अद्याप निश्चित केलेली नाही.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना लोकसभा निवडणुका 2019 पूर्वी 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली होती. तथापि, 1 डिसेंबर 2018 पासून प्रभावी मानले गेले. पहिल्यांदा 3 कोटी 16 लाख 05 हजार 539 शेतकर्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता मिळाला. या योजनेंतर्गत आतापर्यंत 10 कोटीहून अधिक शेतकर्यांची नोंदणी झाली आहे. डिसेंबरमध्ये जाहीर केलेला हप्ता 10 कोटी 70 हजार 978 शेतकऱ्यांना देण्यात आला. आर्थिक वर्ष 2020-21 च्या एप्रिल ते जुलैच्या हप्त्यात जास्तीत जास्त रक्कम शेतकऱ्यांना मिळाली. यावेळी केंद्र सरकारने एकूण 10 कोटी 48 लाख 95 हजार 545 शेतकर्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठविले होते. (After this date, the eighth installment of Kisan Sanman Nidhi will come, Check your name)
नरेंद्र मोदींनी दखल घेतलेलं अकोल्याचं मराठा हॉटेल पुन्हा चर्चेत, वाचा नेमकं कारण काय?https://t.co/yT1muAvefa#MarathaHotel | #Narendramodi | #Farmstories | #farmer
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 26, 2021
इतर बातम्या
7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना बसणार मोठा धक्का, आता DA नंतर TA वाढणार नाही