Apmc Market : या सणानंतर डाळी कडधान्यांचे दर उतरण्याची शक्यता, तो पर्यंत डाळींचा भाव शंभरीपार राहणार

| Updated on: Feb 08, 2023 | 10:44 AM

डाळीची मोठ्या प्रमाणात दलालांनी साठवणूक केल्यामुळे डाळीची किमती मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. शेतकरी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात डाळीची खरेदी केली जाते, त्यानंतर दलाल मोठ्या प्रमाणात साठवणूक करून स्वतः कडे डाळ ठेवतात.

Apmc Market : या सणानंतर डाळी कडधान्यांचे दर उतरण्याची शक्यता, तो पर्यंत डाळींचा भाव शंभरीपार राहणार
Apmc market navimumbai
Image Credit source: tv9marathi
Follow us on

नवी मुंबई : दिवाळी सणाच्या आगोदर डाळी आणि कडधान्याचे (Pulses rate) वाढलेले भाव अजून जशाचं तसे आहेत. होळीच्या सणानंतर दर कमी होतील असा अंदाज एपीएमसी मार्केटमधील (Apmc market navimumbai) घाऊक व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सध्या सर्व डाळी व कडधान्यांचे भाव शंभरीपार गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना खरेदी करताना हात आखडता घ्यावा लागत आहे. होळीनंतर बाजारात नवीन उत्पादन यायला सुरुवात झाल्यानंतर डाळीचे (dal rate) आणि कडधान्याचे दर कमी होतील. दिवाळीच्या दरम्यान नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये डाळी कडधान्य कमी प्रमाणात उपलब्ध झाले होते. त्यामुळे डाळींचा दर अद्याप उतरलेला नाही.

मूगडाळ ९० ते ९८
तूरडाळ 100 ते 125
उडीद डाळ 104 ते 120

सर्वसाधरणपणे दिवाळीनंतर बाजारात नवीन पिकांचे उत्पादन येण्यास सुरुवात होते. परंतु यावर्षी एपीएमसी मधील घाऊक बाजारात दिवाळींनतर येणाऱ्या डाळी, कडधान्यांचे प्रमाण कमी होते. त्यातच आयात होणाऱ्या डाळींचे प्रमाणही कमी आहे. सध्या बाजारात जुनाच माल उपलब्ध आहे. नवीन वर्षात नवीन उत्पादन यायाला सुरुवात झाली की, डाळी कडधान्यांचे भाव कमी होतील. होळीनंतर ही आवक वाढण्याची शक्यता आहे. तो पर्यत हे भाव चढेच राहणार आहे.

हे सुद्धा वाचा

मूग 104 ते 120
मटकी 90 ते 110
चवळी लहान 156 ते 160
चवळी मोठी 105 ते 130
गाबोली चणे 120 ते 156
वाल 180 ते 200

डाळीची मोठ्या प्रमाणात दलालांनी साठवणूक केल्यामुळे डाळीची किमती मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. शेतकरी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात डाळीची खरेदी केली जाते, त्यानंतर दलाल मोठ्या प्रमाणात साठवणूक करून स्वतः कडे डाळ ठेवतात. त्यामुळे बाजारपेठेमध्ये डाळ आवक कमी येत असल्यामुळे डाळीच्या किमतीत भरमसाड व वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.