मुंबई : टोमॅटोच्या टंचाईने भाववाढीचा उच्चांक गाठल्याने मुंबईच्या हॉटेलातील मेनूतून टोमॅटो स्पेशल ( Tomato Special Dishes ) डीश गायब झाल्या आहेत. अनेक डीशेसमध्ये टोमॅटो प्यूरी लागत असल्याने आणि टोमॅटोचे दर ( Tomato Price Hike ) आवाक्या बाहेर गेल्यानंतर आता मेकडोनाल्डने ( Mcdonald’s Restaurant ) ग्राहकांची माफी मागत टोमॅटोचा डीशना फाटा दिल्यानंतर आता हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील टोमॅटो बूर्जी-राईस-भरता या टोमॅटो स्पेशल डीश आता बंद करण्यात आल्याने खवय्यांचे वांदे झाले आहे.
मुंबईलाही देशभरातील टोमॅटो भाववाढीचा फटका हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनाही बसला आहे. टोमॅटोचे भाव शंभर ते दोनशे रुपये किलोवर पोहचले आहे. सलाडमधून टोमॅटो कधीच गायब झाला आहे. साऊथ इंडीयन रेस्टॉरंटनी इडली आणि वड्यासोबत टोमॅटो चटणी देणेही बंद केले आहे. ताडदेव येथील हिंदमाता रेस्टॉरंटने तात्पुरत्या टोमॅटो स्पेशल डीशे मेनूतून हद्दपार केल्या असल्याचे वृत्त टाईम्स दिले आहे. टोमॅटोचे दर आकाशाला भिडल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
अनेक भारतीय डीशमध्ये टोमॅटो प्युरीची गरज लागतच असते. त्यामुळे टोमॅटोला टाळता येत नसले तरी टोमॅटो स्पेशल डीशेश मात्र तात्पुरत्या बंद केल्याचे मुंबईतील 12,000 हॉटेल आणि रेस्टॉरंटचे सदस्यत्व घेतलेल्या संघटनेचे ‘आहार’ या संघटनेचे सुरेश शेट्टी यांनी टाईम्सशी बोलताना सांगितले आहे. यात पावभाजी, टोमॅटो बुर्जी, टोमॅटो भरता, टोमॅटो राईस आदी टोमॅटो स्पेशल डीशेसचा समावेश आहे.
न शिजलेल्या स्वरुपातील टोमॅटो जसे सलाड स्वरुपात टोमॅटो देण्याचे बंद केल्याचे पश्चिम महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा येथील हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनेचे अध्यक्ष प्रदीप शेट्टी यांनी टाईम्सशी बोलताना स्पष्ट केले आहे. टोमॅटो उत्तपा, टोमॅटो सॅण्डविच, इडली आणि वडा बरोबर मिळणारी टोमॅटो चटणी बंद केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरवाढ कमी झाल्यावरच आता पुन्हा त्याचा वापर करण्यात येणार आहे.
टोमॅटो महागल्याने गृहीणींनी कालवण आणि वरणातही टोमॅटो ऐवजी कोकम वापरण्यास सुरुवात केली आहे. उत्तर भारतात जोरदार पर्जन्यवृष्टी, मान्सूनचे बदललेले वेळापत्रक आणि लहरी निर्सगामुळे यंदा टोमॅटोसह अन्य पालेभाज्याचे उत्पन्न घटल्याचे म्हटले जात आहे.