जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी (Farmer) गेल्या अनेक वर्षापासून दुष्काळाची परिस्थितीचे झळ सहन करत आहे. दरवर्षी या भागात दुष्काळाची परिस्थिती होत आहे. यासाठी शासनाने २०१९ पासून पूरक 25 टक्के अनुदान देण्याची घोषणा केली आहे. मात्र शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. चार वर्षे झाले असून अद्यापपर्यंत शेतकरी यांचे 25% पूरक अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे शासनाने पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या विचार करून लवकर मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकारी (Agricultural Officer) कडे केली आहे. त्यासोबत या भागात पाण्याची मोठी समस्या असल्याने या भागासाठी तापी बुराई योजना सुरू करण्याची घोषणा गेल्या अनेक वर्षापासून केली आहे. मात्र ही योजना अजूनही शासनाने तापी बुराई योजना लवकर सुरू करावी, शासनाने शेतकऱ्यांना पूरक 25 टक्के अनुदान आणि तापी बुराई योजना लवकर सुरू करावी अशी मागणी देखील शेतकरी आता करू लागले आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसान झालं आहे. नंदुरबार जिल्ह्यात सतराशे हेक्टर क्षेत्रावर नुकसान झालं असून सर्वाधिक नुकसान रब्बी हंगामातील गहू आणि ज्वारी झालं आहे. त्यासोबत पपई आणि केळीचे देखील यात नुकसान झालं असून, शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. शासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. लवकरच पंचनामे पूर्ण होतील, मात्र शेतकऱ्यांना मदत देखील तातडीने मिळावी अशी अपेक्षा शेतकरी करू लागला आहे. जिल्ह्यातील नवापूर, नंदुरबार आणि शहादा तालुक्यात सर्वाधिक अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे शासनाने कागदी घोडे नाचण्यात दंग न राहता प्रतिक्षेत शेतकऱ्यांना मदत लवकर मिळाला पाहिजे अशी अपेक्षा बळीराजा करू लागला आहे.
शेतकऱ्यांच्या पांढरं सोनू म्हणून ओळख असलेल्या कापसाला गेल्या वर्षाप्रमाणे यंदा देखील समाधान कारक दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. फेब्रुवारी अखेरपर्यंत दर वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला होता. मात्र आता मार्च अर्धा उलटत आला असतांना भाववाढीची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. घरात साठवून ठेवलेले पांढरे सोने आता शेतकऱ्यांच्या जीवावरच उठले असल्याचे दिसून येत आहे. कापसामध्ये किडे तयार होत असून या पिसवांमुळे शेतकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या आरोग्याच्या समस्या होता असून, रुग्णालयात रुग्णांची गर्दीत वाढ होत आहे. मात्र ग्रामीण भागात आरोग्याच्या समस्या नसल्याने शेतकऱ्यांना आता शहरात रुग्णालयासाठी यावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे सोनं आता शेतकऱ्यांसाठी जीवावरच उठले असल्याचे दिसून येत आहे.