सोलापूर : सोलापूरातील (Solapur) दोन भावडांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे अशी चर्चा सध्या सुरु आहे. दोन भावांनी ९ एकरात ऊस (sugarcane farming) लावला. तो ऊस कारखान्याला न पाठवता तिथचं त्यांनी रसवंती (Raswanti) सुरु केली. त्यातून त्यांनी महिन्याला लाखो रुपयांची कमाई केली. त्यांनी एक ग्लास पाच रुपयाला विकला असल्याचे सांगितले आहे. पाच रुपयाला रस मिळत असल्यामुळे त्यांची सगळीकडे अधिक चर्चा होती. दररोज हजारो रुपये कमावले, तर महिन्याला सव्वा लाख रुपयांच्यावरती कमाई होती. त्यामुळे दोघा भावांची सगळीकडे चर्चा होती.
शेतातला ९ एकर ऊस कारखान्याला न पाठवता माढ्याच्या ‘लऊळ’ मधील शेतकरी भावंडानी रसवंती सुरू केली. ५ रुपयात रस देत असल्याने ते अधिक लोकप्रिय झाले आहेत. दररोज हजारो रुपयांची तर, महिन्याला सव्वा लाखांची भावंडे करतात कमाई करतात. त्यांनी नवा जुगाड शोधून काढल्यामुळे त्यांचं अनेकांनी कौतुक केलं आहे. ज्यांना शक्य आहे अशा लोकांनी अशी रसवंती सुरु करायला हवी अशी देखील चर्चा सुरु आहे.
विशेष म्हणजे सध्या पाण्याची बॉटल २० रुपयाला मिळते. तिथेचं लोकरे बंधु ५ रुपयात चविष्ट ऊसाचा रस देत असल्याने त्यांच्या रसवंसीती लोकप्रिय झाली आहे. समजा, तुम्ही कारखान्याला ऊस पाठवला तर तुम्हाला बिलाची वाट पाहावी लागते. परंतु गावात रसवंती सुरु केल्यामुळे रोजच्यारोज पैसे मिळत आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांनी अशा पद्धतीचा जुगाड देखील केला आहे.