यवतमाळ : यवतमाळ (YAVATMAL) जिल्ह्यातील मृग नक्षत्रला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनी (FARMER NEWS) बियाणे खरेदीची लगबग सुरू केली आहे. मात्र मागच्या खरीप हंगामामध्ये कापूस, सोयाबीन या पिकांना योग्य भाव नसल्यामुळे शेतकरी अजूनही चिंतेत आहे. शेतकऱ्यांनी अजूनही मालाची विक्री केलेली नाही. मात्र सध्या खरीपाच्या तोंडावर तुरीचे भाव वाढल्याने आता शेतकरी तुर विक्रीसाठी बाजार समितीत (Agricultural News in marathi) आणत आहे. खरीपासाठी कपाशी, सोयाबीन, खते बी बियाणे खरेदी करीत आहेत. गेल्यावर्षी पावसाने खरीप आणि रब्बी असं दोन्ही पिकांचं नुकसान केलं. त्यातून वाचलेल्या पिकाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे.
यवतमाळ बाजार समितीमध्ये मागील तीन ते चार दिवसांपासून तुरीचे भाव वधारले, असून 9 हजार ते 10 हजार 500 रुपये क्विंटल पर्यंत दर पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकरी आता बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात तूर विक्रीसाठी आणत करीत आहे. या बाजार समितीमध्ये दररोज तीन ते चार हजार क्विंटल तूर विक्रीसाठी शेतकरी आणली जात आहे. तुरीला चांगला भाव मिळाल्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. कारण खरीप हंगामात बी-बियाणे आणि खते खरेदी केली जाणार आहेत.
हिंगोली जिल्ह्यात काल सायंकाळी काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे कळमनुरी तालुक्यातील वरुडसह अनेक ठिकाणीच्या शिवारात केळी बागेचे नुकसान झाले, तर सेनगाव तालुक्यात काहकर बुद्रुक येथे सोलार वरील प्लेट उडून गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सध्या मान्सूनपूर्व पाऊस सुरु झाला असून, त्यामुळे शेतकरी वर्ग आनंदात आहे. त्याचबरोबर यंदा चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे शेतकरी पेरणी करीत आहे.