लातूर : होळीच्या सणानिमित्त राज्यातील काही मुख्य (Market Committee) बाजार समित्यांमधील व्यवहार हे बंद राहणार आहेत. यामध्ये लातूर, सोलापूर, लासलगाव, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या बाजार समित्यांचा सहभाग आहे. या दरम्यानच्या कालावधीत व्यवहारच होणार नाही. सध्या खरिपातील तूर आणि रब्बी हंगामातील (Chickpea Crop) हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मात्र, आता हे व्यवहार बंद असल्याने शेतकऱ्यांची अडचण होणार पण नाफेडने सुरु केलेल्या हमीभाव केंद्राचा पर्याय शेतकऱ्यांकडे खुला आहे. तूर आणि हरभरा (Shopping Center) खरेदी केंद्रावर नोंदणी आणि शेतीमालाची विक्री असे दोन्ही प्रकार सुरु राहणार आहेत. शिवाय खुल्या बाजारापेक्षा हरभरा आणि तुरीला दरही अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल आता खरेदी केंद्राकडे वाढत आहे. खरेदी केंद्रावर हरभऱ्याला 5 हजार 230 तर तुरीला 6 हजार 300 चा दर ठरवून देण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेली आहेत. खरेदी केंद्राची संख्या ही 60 वर गेली असून आता शेतकऱ्यांचा कल केंद्राकडे वाढत आहे. हंगामाच्या सुरवातीला शेतकऱ्यांमध्ये जनजागृती नव्हती त्यामुळे अत्यल्प प्रतिसाद होता पण गेल्या आठ दिवसांपासून खरेदी आणि नोंदणी या दोन्ही बाबींमध्ये वाढ झाल्याचे खरेदी केंद्र चालक लालासाहेब देशमुख यांनी सांगितले आहे. आता सलग पाच दिवस बाजार समित्या बंद असल्याने नोंदणीसाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे. मात्र, नोंदणीप्रमाणेच हरभऱ्याची खरेदी केली जात आहे. हमीभाव केंद्र आणि खुल्या बाजारपेठेतील दरात मोठी तफावत असल्यामुळे शेतकरी संख्या वाढत आहे.
हरभरा आणि तुरीच्या काढणीप्रसंगी अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण होते. त्यामुळे या धान्यामध्ये आर्द्रतेचे प्रमाणही अधिक होते. आर्द्रतेचे प्रमाण अधिकचे असल्यावर त्याची खरेदी ही केंद्रावर करता येत नाही. मात्र, गेल्या चार दिवसांपासून ऊन्हामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे आर्द्रतेचा प्रमाण आपोआपच कमी झाले आहे. शेतकऱ्यांना आता हरभरा विक्रीसाठी कोणतीच समस्या नसल्याचेही केंद्र चालक देशमुख यांनी सांगितले आहे.
खरिपातील तूर आणि रब्बी हंगामातील हरभऱ्यासाठी नाफेडच्या माध्यमातून खरेदी केंद्र ही सुरु करण्यात आलेली आहेत. तुरीसाठी 6 हजार 300 असा दर ठरवून देण्यात आला आहे. तर खुल्या बाजारातही तुरीला 6 हजार 300 असाच दर आहे. त्यामुळे खरेदी केंद्रावरील आवक ही कमी आहे. तर दुसरीकडे हरभऱ्याला खरेदी केंद्रावर 5 हजार 230 रुपये दर आहे मात्र खुल्या बाजारात 4 हजार 500 इथपर्यंतच दर मिळत आहे. यामध्ये मोठी तफावत असल्याने आता कुठे खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.
Summer Soybean : शेतकऱ्यांची मोहीम फत्ते, लेट पण थेट सोयाबीनचा विक्रमी पेरा, बियाणाचा प्रश्न मार्गी