बीड : काळाच्या ओघात (Farming System) शेतीचे स्वरुप हे बदलत आहे. यंदाच्या खरीप आणि रबी हंगामात याचा प्रत्यय (Maharashtra) राज्यातील शेतकऱ्यांना आलाच आहे. त्यामुळे आता निसर्गावर आधारित शेती हाच एकमेव पर्याय असल्याचे (Weather expert) हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला आहे पण निसर्गाचा अडथळा होत असल्याने आर्थिक तर नुकसान होतच आहे पण शेतकऱ्यांचा उद्देशही साध्य होत नाही. भारतामध्ये पर्जन्यमानात अनिश्चितेचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे निसर्गाच्या विरोधात जाऊन शेती न करता त्याचा अंदाज पाहूनच शेतीमध्ये बदल केल्यास शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचा सल्ला त्यांनी जिल्ह्यातील केज येथे आयोजित व्याख्यानमालेत दिला आहे.
सन 1996 ते 2001 या पाच वर्षाच्या काळात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली होती. वृक्षतोडीचा परिणाम आणि हवामान अंदाज सांगण्यास सुरवात केल्याचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितले. मात्र, त्या दरम्यान प्रभावी यंत्रणा नसल्याने थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहचता आले नाही. पण 2015 अॅंन्ड्राईड मोबाईलमुळे हे शक्य झाले आहे. शेतकऱ्यांना हवामान अंदाजाचा फायदा व्हावा म्हणून 36 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे व्हॅटस्अप ग्रुप बनविण्यात आले आहेत. एका ग्रुपमध्ये 700 शेतकरी याप्रमाणे नोंदणी केली आहे. त्यामुळे एक संदेश हजारो शेतकऱ्यांपर्यंत पोहचत आहेत. तर आतापर्यंत 14 हजार गावांना भेटी दिल्याचेही त्यांनी सांगितले.
आहे शेती म्हणून करण्यात अर्थ नाही. तर पीक पध्दतीपासून ते बाजारपेठेपर्यंतचा अभ्यास करुनच उचललेले पाऊल महत्वाचे ठरणार आहे. काळाच्या ओघात तरुण शेतकरी आशा गोष्टी आत्मसात करीत आहेत पण यामध्ये अधिक वाढ होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी कमर्शियल होणे गरजेचे आहे. तर शेती व्यवसयातून फायदा होणार आहे. व्यवसायात अत्याधुनिक यंत्राचा वापर वाढत आहे पण त्याच बरोबरीने उत्पादन वाढणेही गरजेचे आहे.
हवामानबाबत जागृती होत आहे. 1920 ते 2022 या कालखंडात 132 वेळा आवर्षणाची परस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता हवामान आणि पर्जन्यमानाच्या आधारित शेती करण्याचे कसब शेतकऱ्यांनीच आत्मसात केले तरच नुकसान टळणार आहे. शेतीचा आराखडा तयार करुनच शेती केल्यास नुकसान टळणार आहे तर उत्पादनामध्येही वाढ होणार आहे. पर्यावरण हा खूप मोठा विषय असला तरी शेतीच्या अनुशंगाने महत्वाचे असणारे ज्ञान आत्मसात करण्याचा सल्ला सेवानिवृत्त अभियंता हनुमंत देशमुख यांनी दिला.