औरंगाबाद : उत्पादन आणि उत्पन्नाच्या दृष्टीकोनातून (Kharif Season) खरीप हंगामच महत्वाचा आहे. उत्पादनावर खर्च कमी अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी कृषी विभागाचीही महत्वाची भूमिका राहिलेली आहे. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी (Soybean Seeds) बाजारपेठेतील विकतचे बियाणे घेण्यापेक्षा घरगुती बियांणावरच लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. यामुळे खर्च कमी आणि (Production Increase) उत्पादन अधिक अशी परस्थिती निर्माण होईल. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करुन बियाणांचा वापर करणेही तेवढेच महत्वाचे आहे. खरीप हंगामात एक ना अनेक पर्याय अवलंबून उत्पादन वाढीचा प्रयत्न राहणार आहे.
पेरणीनंतर सोयाबीन उगवलेच नाही आणि उगवले तरी शेंगा लागल्याच नाहीत अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी ह्या ठरलेल्या आहेत. यामुळे आर्थिक नुकसान तर होतेच पण संपूर्ण हंगाम वाया जातो. सततच्या पावसामुळे विविध बियाणे कंपनीचे सीड प्लॉट हे यशस्वी होतीलच असे नाही. शिवाय यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढणार असल्याने बाजारपेठेतील बियाणे पुरेल का नाही अशी शंकाही उपस्थित होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरच्या बियाणांवरच भर देण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असून आतापासूनच सुक्ष्म नियोजन केले तरच उत्पादनात वाढ आणि खर्चात कमी होणार आहे.
पेरणीच्या आगोदर सर्वात महत्वाची प्रक्रिया म्हणजेत बीजप्रक्रिया. शेतात सोयाबीन उभे असताना भेसळ काढणे तसेच कीड व रोगग्रस्त झाडे काढूण टाकणे महत्वाचे आहे. काढणी पश्चातही उगवण टिकवून ठेवण्यासाठी बुरशीनाशकाची फवारणी करावी लागणार आहे.सोयाबीन वाळविताना मोठा ढीग न करता पातळ थर करावे लागणार आहेत. शिवाय मळणी करताना 13 ते 14 आर्द्रता असू नये. मळणीनंतर पोत्यात भरण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी जाऊ द्यावा असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
दरवर्षी बियाणे बदलावे असे काहीच नाही. एकदा वापरलेले बियाणे हे पुढील वर्षी देखील वापरता येणार आहे. दरवर्षी नवीन बियाणे वापरल्याने खर्चात वाढ होते पण उत्पादनाची हमी नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनाची हमी नाही. शिवाय यामुळे खर्चात वाढ झाल्यास नुकसानच होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विकतच्या बियाणांपेक्षा घरच्या बियाणांवरच भर देणे गरजेचे आहे.