नवी दिल्ली : राज्यात शेतकऱ्यांनी (Farmer) अजून नैसर्गिक संकट किती दिवस झेलायचं अशी चर्चा सुरु आहे. मागच्या पंधरा दिवसांपुर्वी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) अनेक राज्यांना झोडपून काढले. अजूनही काही राज्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने पुढच्या चोवीस तासात हवामान बदलाचे संकेत दिले आहेत. पण सध्या शेतात असलेल्या पिकांवर किडींनी हल्ला (Crop demaged) करण्यास सुरुवात केली आहे. अवकाळी पावसाने भाजीपाल्याचं मोठं नुकसान केलं आहे. कृषी अधिकाऱ्यांनी पिकांची काळजी घेण्यासाठी एक सुचना जाही केली आहे.
देशात पुढच्या चोवीस तासात हवामान बदलणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिली आहे. सध्या वाऱ्याचा वेग वाढणार असून २४ तासांत हवामानात बदल होणार आहे. ताशी 14 ते 18 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. वातावरणातील बदलामुळे भाजीपाला व फळांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव एकाचवेळी होऊ शकतो.
शेतकऱ्यांना लागलेली कीड सुरुवातीला ओळखणं अधिक अवघड असतं. अशा स्थितीत शेतकरी एखाद्या औषधांची फवारणी पीकांवर करु लागतात. अशावेळी कीट कोणत्या पद्धतीची आहे, त्याचं निराकरण केल्यानंतर योग्य ती फवारणी करावी. त्याचबरोबर एखाद्या गोष्ट समजली नाहीतर, तिथं असलेल्या संबंधित कृषी अधिकाऱ्याची तुम्ही भेट घ्या.
डॉ. एसएस तोमर म्हणतात, की रस पिणारे अधिक कीटक पींकावर हल्ला करतील, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान होईल. अधिकतर भाजीपाला खराब होईल. सारखं-सारखं वातावरणात बदल होत असल्यामुळे अनेक कीटक पींकावर हल्ला करणार एवढं मात्र नक्की. देशात आज सुध्दा अनेक राज्यात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.