Agriculture News : धुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे नुकसान, संकटात असलेल्या शेतकऱ्यांचं सरकारच्या मदतीकडं लक्ष

| Updated on: Jan 31, 2023 | 11:35 AM

Agriculture News : धुळे जिल्ह्यात पावसामुळे गहू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी मोठ्या संकटात

Agriculture News : धुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे नुकसान, संकटात असलेल्या शेतकऱ्यांचं सरकारच्या मदतीकडं लक्ष
Agriculture News dhule
Image Credit source: tv9marathi
Follow us on

धुळे : धुळे (Dhule) जिल्ह्यात अनेक भागात काल अवकाळी पावसाने हजेरी लावली. पंधरा मिनिटे चाललेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सायंकाळच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानंतर अवकाळी पावसाला पावसाला सुरुवात झाली. काल पाऊस कमीवेळ झाला, परंतु मुसळधार (heavy rain) असल्यामुळे नुकसान मोठं झालं आहे. पावसामुळे मोराने गावात अनेक शेतकऱ्यांचे गव्हाच्या पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. भिजलेल्या गाव्हाला आता या पावसाचा फटका बसल्याने उत्पन्नात घट असल्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे शेतकरी (Agriculture News) मोठ्या संकटात सापडला आहे.

गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला होता. त्यावेळी सुध्दा शासनाच्या वतीने पिक विमा काढावा असं सांगितलं होतं. शेतकऱ्यांनी पीक विमा काढला, मात्र नुकसान झाल्यानंतर एक वर्ष उलटूनही सरकार पीक विम्याचे पैसे देत नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजार रुपये टाकू असं सांगितलं होतं. पण धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ते पैसे देखील आलेले नाही. त्यामुळे कोणाचही सरकार आलं तरी शेतकऱ्यांची फसवणूक होते अशी भावना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा


गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे धुळे जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे मोठे नुकसान झालं होतं. शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे त्याची नोंद केलेली असताना सुध्दा पंचनामे झाले नाही. मात्र अद्यापही ती रक्कम खात्यावर आली नसल्याने शेतकऱ्यांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.