महाराष्ट्र : चुकीचं औषध फवारणीसाठी दिल्याने एक एकर वरील टरबूज पिकाची (Watermilon crop) पूर्णपणे नासाडी झाल्याची घटना परभणी (parbhani farmer) जिल्ह्यातील राणी सावरगाव येथे घडली. टरबूज काढणीच्या केवळ आठ दिवस आधी शेतकऱ्याने गंगाखेड येथील श्रीराम कृषी केंद्रावरून (shriram agriculture centre) नियमित औषध आणून फवारणी केली. मात्र चुकीचं औषध दिल्याने दुसऱ्याच्या दिवशी पूर्ण पिक करपून गेलं असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी सांगितली आहे. त्यामुळे शेतकरी केशव सुरनर यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. या प्रकरणाची तक्रार कृषी विभागाकडे केली असून, संबंधित कृषी केंद्रावर कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकऱ्याने केली आहे.
शहादा शिरपूर रस्त्याचे दुरवस्था झालेली आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहनधारक ये-जा करत असतात. तर या रस्त्यावर सर्वाधिक ऊसाच्या वाहतूक होत असते. मात्र रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्यामुळे ऊस वाहतूक करण्यास चालक नकार देत आहेत. एकीकडे ऊस तोडणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मात्र वाहनधारक ऊस घेऊन जाण्यास नकार देत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
धुळे तालुक्यातील धमाने येथील भगवान पाटील या शेतकऱ्याने आपल्या दोन एकर शेतात सूर्यफूलाचे पीक घेतले आहे. अवघ्या दोन एकरात यावर्षी 14 क्विंटल सूर्यफुलाचे उत्पादनं निघाल आहे. त्यातून एक लाख रुपयांची कमाई झाली आहे.
परिपक्व झालेली लाखोरी उपटून शेतातील तनसीचे ढीगाजवळ ठेवली होती. अचानक आग लागून जळाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोगरा/शिवणी येथे घड़ली आहे. अल्पभूधारक शेतकरी पुरुषोत्तम नारायण राऊत यांचे 13 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. दरम्यान तलाठ्याने नुकसानीचा पंचनामा केला असून आता नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील चांडोळा इथल्या शेतकऱ्यांने अमेरिकन चिया सीडची लागवड केलीय. कमी खर्चात आणि कमी पाण्यावर चिया सीड पिकाचा हा प्रयोग यशस्वी झाला आहे. तब्येतीला पोषक मूलद्रव देणारे चिया सीड शेतीचा प्रयोग वाढविण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यातून चांगले उत्पन्न होतेय असा अनुभव शेतकरी सांगतायत.
नांदेडमध्ये उन्हाळी टाळकी ज्वारीच्या काढणीला वेग आलाय, शेत शिवारात यंत्राद्वारे ज्वारी काढून घरी नेण्याची शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे. विशेष म्हणजे यंदा टाळकी ज्वारीचे उत्पादन अपेक्षेपेक्षा जास्त असून सध्या बाजारात देखील तेजी आहे. त्यामुळे शेतकरी दिवसरात्र मेहनत करून ज्वारी काढणीच्या कामात गुंतला आहे.