कष्टाचे झाले चीज, शेतकऱ्याने झेंडू शेतीतून मिळवलं लाखोंचं उत्पन्न

| Updated on: Feb 28, 2023 | 3:08 PM

शेती करीत असताना शेतकऱ्यांनी अनेक प्रयोग करायला हवेत, त्याबरोबर शेतात कमीत कमी रोज आठ तास राबायला हवे असं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे.

कष्टाचे झाले चीज, शेतकऱ्याने झेंडू शेतीतून मिळवलं लाखोंचं उत्पन्न
शेतीत नेहमीच नाविन्यपूर्ण प्रयोग करतात
Image Credit source: tv9marathi
Follow us on

अहमदनगर : संगमनेर (sangamner) तालुक्याच्या कुरकुटवाडी येथील ज्ञानेश्वर सहाणे आणि निवृत्ती सहाणे या शेतकरी (farmer) बंधूंनी आपल्या तीन एकर शेतीत ‘अप्सरा यल्लो’ या झेंडूच्या फुलांची लागवड (Cultivation of marigold flowers) केली आहे. आता ही शेती फुलली असून, जणूकाही पिवळ्या सोन्याची खाणच दिसत आहे. सध्या फुलांना प्रतिकिलो ७५ ते ८० रुपयांचा भाव मिळत असून सहाणे बंधूंच्या जीवनात आर्थिक समृद्धी आल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर त्यांनी केलेल्या कष्टाचं चीज झालं अशी सगळीकडं चर्चा आहे.

शेतीत नेहमीच नाविन्यपूर्ण प्रयोग करतात

ज्ञानेश्वर आणि निवृत्ती सहाणे हे सख्खे बंधू शेतीत नेहमीच नाविन्यपूर्ण प्रयोग करत आले आहेत. त्यांना अवघी चार एकर शेती असून त्यांनी तीन एकर क्षेत्रावर मल्चिंग पेपरवर अप्सरा यल्लो झेंडूची लागवड केली आहे. तंत्रज्ञान आणि मेहनतीच्या बळावर चांगले उत्पादन निघत असून सरासरी ८० रुपये प्रतिकिलो प्रमाणे काही महिन्यातच लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाल आहे. त्यामुळे त्यांची संगमनेर जिल्ह्यात सगळीकडं चर्चा सुरु आहे. त्याच अनेक शेतकऱ्यांनी भेट दिली असून पीकाची माहिती सुद्धा घेतली आहे असं शेतकरी ज्ञानेश्वर सहाणे यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांनी कमीत कमी आठ तास शेतीत काबाडकष्ट केले…

विशेष म्हणजे सहाणे बंधूंच्या या मेहनतीला कुटुंबियांची देखील भक्कम साथ मिळाली आहे. नोकरदार वर्ग ज्याप्रमाणे आठ तास काम करतो. त्याच पद्धतीने शेतकऱ्यांनी कमीत कमी आठ तास शेतीत काबाडकष्ट केले, तर शेतकरी नक्कीच यशस्वी होऊ शकतो. अशा भावना सहाणे बंधूंनी व्यक्त केल्या आहेत. बाजारपेठ, वातावरण आणि शेतीत नवीन प्रयोग करण्याचे तंत्र आत्मसात केले पाहिजे. तर इतरही शेतकरी सहाणे बंधुंप्रमाणे आर्थिक सुबत्ता साधू शकतात एव्हढे मात्र नक्की असंही त्यांनी सांगितलं आहे.

हे सुद्धा वाचा

अनेक तरुणांनी युट्यूब पाहून शेती करण्यास सुरुवात केली आहे. अनेक तरुणांनी अनोख्या पद्धतीने शेती करुन चांगलं उत्पन्न सुध्दा काढलं आहे.