Terrace Gardening : आता छतावर करा आंबा, पेरू आणि लिंबूची शेती; मिळेल भरगोस उत्पादन

| Updated on: Jun 29, 2023 | 9:33 PM

आता हिरव्या भाजीपाल्यासह फळांचेही उत्पादन टेरेस गार्डनिंगमध्ये घेत आहेत. लिंबू, संत्री, सफरचंद आणि पेरूसारखे फळ छतावर काढत आहेत.

Terrace Gardening : आता छतावर करा आंबा, पेरू आणि लिंबूची शेती; मिळेल भरगोस उत्पादन
Follow us on

नवी दिल्ली : शहरात टेरेस गार्डनिंगचे फॅड वाढत आहे. लोकं घराच्या छतावर तसेच बालकनीमध्ये हिरवा भाजीपाला काढत आहेत. छोट्या शहरापासून मोठ्या शहरापर्यंत हजारो लोकं छतावर वांगे, टमाटर, लसूण, भेंडी, हिरवी मिरची, शिमला मिरची, सांबार आणि कांद्याची शेती करतात. आवश्यक भाजीपाला टेरेस गार्डनिंगमधून काढतात.

देशी रोपी कुंड्यांमध्ये लावणे शक्य नाही

परंतु, आता हिरव्या भाजीपाल्यासह फळांचेही उत्पादन टेरेस गार्डनिंगमध्ये घेत आहेत. लिंबू, संत्री, सफरचंद आणि पेरूसारखे फळ छतावर काढत आहेत. काही लोकं ड्राय फ्रूट्सचीही शेती करत आहेत. हायब्रीड रोपं छतावर लावतात. कारण देशी आंबे, पेरूचे झाडं उंच वाढतात. त्यांची मुळ जमिनीत पसरत असतात. त्यामुळे देशी जातीची झाडं कुंड्यांमध्ये लावणे शक्य नाही.

 

रासायनिक खतांचा वापर करू नका

छतावर आंबा, केळी, पपई, पेरू आणि लिंबू यांची शेती सुरू करत असाल तरी चुकून रासायनिक खतांचा वापर करू नका. कुंडीत शेण आणि वर्मी कंपोस्टची माती टाकावी. यामुळे रोपाची वाढ झपाट्याने होते. भाजीपाल्याचे छिलटे कुजवून त्यांचा वापर खत म्हणून करू शकता. कुजलेलं खतं सेंद्रीय शेतीचे काम करते.

मातीसह शेण टाकावे

दोन फूट उंच कॅरी काढावी. मातीसह शेण टाकावे. त्यात तुम्ही कोणत्याही प्रकारची शेती करू शकता. काही राज्य छतावर शेती करण्यासाठी प्रोत्साहन देतात. सरकार छतावर शेती करणाऱ्यांना अनुदान देते. विशेषता बिहारमध्ये ग्राहकाची सही घेतली की झालं. बिहार हे शेतीच्या बाबतीत चांगले आहेत.

टेरेस गार्डनिंगवर पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर हेही मार्गदर्शन करतात. शहरात येणारा भाजीपाला रासायनिक खतांपासून तयार केला जातो. त्यामुळे सेंद्रीय शेतीकडे लोकांचा कल जास्त आहे. रासायनिक खत,औषधाची दुष्परिणाम आता लोकांना समजू लागले आहेत. त्यामुळे ते सेंद्रीय शेतीकडे वळत आहेत.