शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या कृषी केंद्रांचे परवाने रद्द, शेतकऱ्यांकडून कृषी विभागाचं कौतुक

| Updated on: Jul 08, 2023 | 9:46 AM

महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्यांची पेरणी अंतिम टप्प्यात आहे. मागच्या महिन्यात कृषी विभागाने बोगस बियाणे विकणारी टोळी किंवा कृषी केंद्र चालकांवरती कारवाई केली आहे.

शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या कृषी केंद्रांचे परवाने रद्द, शेतकऱ्यांकडून  कृषी विभागाचं कौतुक
daryapur bogus seeds
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अमरावती : अमरावती (Amravati news) दर्यापूरात शेतकऱ्यांच्या तक्रारीवरुन कृषी केंद्र संचालकाविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दर्यापूर (daryapur bogus seeds) येथे अजित 155 कपाशी बियाणांचा काळाबाजार झाल्याचं मागच्या काही दिवसांपूर्वी उजेडात आलं होतं. दर्यापूर न्यू कृषी केंद्राचे संचालक प्रमोद टोपले यांच्यावर ४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी केंद्र (agricultural centre) ८५० रुपयांची बियाणांची बॅग १२०० रुपयांना शेतकऱ्यांना विकत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या कृषी केंद्राचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पुढे पाठवण्यात आला आहे.

इतर राज्यातून महाराष्ट्रात विक्रीसाठी आलेलं बोगस बियाणे महाराष्ट्रातील कृषी अधिकाऱ्यांनी पोलिसांनी अनेकदा पकडलं आहे. त्याचबरोबर ज्या कृषी केंद्र चालकांनी बोगस बियाणे विकले आहेत. त्यांच्यावर सुध्दा कारवाई करण्यातं आली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बोगस बियाणे सापडल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत होता. परंतु कृषी विभागाकडून खात्री केल्याशिवाय कोणतंही बियाणं खरेदी करु नये असं सांगितलं होतं.

सोयाबीन चोरटा मुद्देमालासह अटक

हे सुद्धा वाचा

वाशिम येथील अडत व्यापाऱ्याचा ३२२ पोते सोयाबीन शेतमाल सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे पोहचविण्यासाठी ट्रकमध्ये भरला. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ट्रकचालकावरती कारवाई केली. बीड जिल्ह्यातील वडगाव येथील रघुनाथ खाटिक असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले ८ लाख ६६ हजाराचे सोयाबीन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी वाशिम शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात सध्या पाऊस सुरु झाला असून पेरणीची कामांना वेग आला आहे. उशिरा पाऊस दाखल झाल्यामुळे उत्पादन कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.