CRIME NEWS : टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला चोरट्यांनी लुटले, साडेचार लाखो रुपये घेतल्यानंतर केली बेदम मारहाण

| Updated on: Aug 04, 2023 | 9:26 AM

TOMATO NEWS : मागच्या महिन्यांपासून टोमॅटोचे दर अधिक वाढले आहेत. त्यामुळे सध्या ज्या शेतकऱ्याकडे टोमॅटो आहे. तो शेतकरी अधिक पैसे कमावत आहे, अशा एका शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली आहे.

CRIME NEWS : टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला चोरट्यांनी लुटले, साडेचार लाखो रुपये घेतल्यानंतर केली बेदम मारहाण
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रासह (MAHARASHTRA) संपूर्ण देशात टोमॅटो (TOMATO RATE INCRESED) अधिक महाग झाल्यामुळे सामान्य नागरिकांच्या जेवणातून टोमॅटो हद्दपार झाला आहे. त्याचबरोबर टोमॅटो अजून महाग होण्याची शक्यता देशातल्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सध्या टोमॅटो आहे. त्यांना टोमॅटो विक्रीतून चांगले पैसे मिळत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. मागच्या काही दिवसापुर्वी एका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला मारहाण (FARMER NEWS IN MARATHI) करुन त्याची हत्या केली होती. ही घटना आंध्र प्रदेश राज्यात घडली होती. त्याचबरोबर चोरट्यांनी त्यांच्याकडील पैसे सुध्दा चोरले होते.

टोमॅटोचा भाव देशभरातल्या मोठ्या शहरात अधिक आहे. अनेक ठिकाणी 200 रुपयांच्या पुढे गेला आहे. सध्या टोमॅटोची गणना महागड्या भाजीत केली जात आहे. एकेकाळी शेतकरी टोमॅटोला योग्य भाव न मिळाल्याने रस्त्यावर फेकत होते. आजकाल काही शेतकरी करोडोंची कमाई करीत आहेत.

काही शेतकरी आपल्या शेतातील टोमॅटो चोरीला जाऊ नये, म्हणून दिवस आणि रात्र शेतीला राखण देत आहेत. देशात टोमॅटो चोरीच्या घटना अधिक वाढल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

आंध्र प्रदेश राज्यातील चित्तूर जिल्ह्यात टोमॅटोचं अधिक पीक घेतलं जातं. टोमॅटो पीक प्रचंड नुकसान करीत असल्यामुळे ते पीक घेण्याकडे अधिक शेतकऱ्यांचा कल नव्हता. परंतु सध्या शेतकरी त्यातून अधिक पैसे कमावत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात राजशेखर रेड्डी नावाच्या शेतकऱ्याची कमाई लुटण्यासाठी हत्या केली.

सध्या आंध्र प्रदेशातील एक असाच प्रकार उजेडात आला आहे.एका शेतकऱ्यावर दरोडेखोरांनी जोरदार हल्ला केला. लोकराज नावाचा शेतकरी आपले टोमॅटोचे पीक मंडईत विकून 4.50 लाख रुपये घेऊन निघाला होता. त्यावेळी काही लोकांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. शेतकऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. जखमी शेतकऱ्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.