जीतेंद्र बैसाणे, नंदुरबार : शेतकऱ्यांच्या (MAHARASHTRA FARMER) पांढरे सोन्याला चांगला भाव मिळत नसताना शेतकऱ्यांना मोठं आर्थिक भुदंड सहन करावा लागत आहे. कापसाने (COTTON) खरेदीच्या मुहूर्तावर चांगल्या भावाची सुरुवात होती. मात्र नंतर कापसाचे दर असे गडगडले की पुन्हा उभारलेच नाही. बाजारभाव (MARKET RATE) कमी असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता करावा काय अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहे.
काही शेतकऱ्यांनी कापसाला चांगला भाव मिळणार असल्यामुळे त्यांनी कापूस घरातच साठवून ठेवला आहे. तर काही शेतकरी मध्यप्रदेश राज्यात जाऊन कापसाची विक्री करत आहेत. मध्यप्रदेश मध्ये कापसाला भावजरी चांगला मिळत असला मात्र वाहतुकीच्या खर्च अधिक असल्याने मध्यप्रदेश येथे विक्री करणे देखील परवडत नाही. त्यामुळे मध्यप्रदेश राज्य प्रमाणेच महाराष्ट्रात कापसाला भाव देण्यात यावे अशी मागणी आता बळीराजा करू लागला आहे.
अनेक शेतकऱ्यांनी कापसाला चांगला भाव मिळणार असल्यामुळे घरात कापूस साठवून ठेवला आहे. महाराष्ट्रात कापसाला योग्य भाव कधी मिळणार याकडे त्यांचे डोळे लागले आहेत. त्याचबरोबर ज्यांनी मध्यप्रदेशात जाऊन कापूस विकला, त्यांना तिथं जाऊन कापूस विकायला काय परवडतं असाही प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.